Advertisement

काही तरी तुफानी करायचंय? मग मिस्ट्री रूमला भेट द्या!

पहिल्यांदाच मुंबईत मिस्ट्री रूम ही संकल्पना आली आहे. परदेशात असे अनेक गेम्स खेळले जातात. पण आता मुंबईकरांना देखील या गेमचा भाग होण्याची संधी मिळाली आहे. या गेममध्ये चार टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यात तुम्हाला वेगवेगळे टास्क दिले जातात. या टास्कमध्ये तुम्हाला रिअल सिच्युएशनमध्ये सोडलं जातं. या रिअल सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी तुमचा ग्रुप मदत करेल.

काही तरी तुफानी करायचंय? मग मिस्ट्री रूमला भेट द्या!
SHARES

'क्रिस्टल मेज' आणि 'सिक्रेट ऑफ द हिडन टेम्पल' हे टीव्हीवर लागणारे अॅडव्हेंचर गेम शो आठवतात का? नाही आठवत? अरे हेच ते गेम आहेत ज्यात जोडीनं किंवा ग्रुपनं खेळता यायचं. तुम्हाला प्रत्येक टप्प्यात काही ना काही टास्क दिले जाणार. ते टास्क पूर्ण करत तुम्हाला गेम शोचा किताब जिंकायचा असतो. आता तरी आठवला का? नाही आठवला? मग जाऊदे. पण तुम्हाला या गेम्सची आठवण करून देण्यामागे कारणही तसं आहेच. कधी काळी पाहिलेले किंवा न पाहिलेले हे गेम्स तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले तर? मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. यासाठी तुम्हाला मुंबईत 'मिस्ट्री रूम' या अॅडव्हेंचर गेमचा अनुभव घेता येणार आहे


मिस्ट्री रूम म्हणजे काय?

पहिल्यांदाच मुंबईत मिस्ट्री रूम ही संकल्पना आली आहे. परदेशात असे अनेक गेम्स खेळले जातात. पण आता मुंबईकरांना देखील या गेमचा भाग होण्याची संधी मिळाली आहे. या गेममध्ये चार टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यात तुम्हाला वेगवेगळे टास्क दिले जातात. या टास्कमध्ये तुम्हाला रिअल सिच्युएशनमध्ये सोडलं जातं. या रिअल सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी तुमचा ग्रुप मदत करेल. टास्क पूर्ण करण्यासाठी लपवण्यात आलेले क्लू ग्रुप मेंबर्सना शोधायचे आहेत. हे चार टास्क पूर्ण करण्यासाठी एका ग्रुपला ६० मिनिटांचा कालावधी मिळतो.


टीम वर्कची गरज!

या गेममध्ये असणारे टास्क पूर्ण करण्यासाठी टीम वर्कची आवश्यकता आहे. त्यानुसारच हा गेम तयार करण्यात आला आहे. ग्रुपमधल्या सर्व सदस्यांना एकत्र येऊन प्लॅन करून एक एक टास्क पूर्ण करायचा आहे. सदस्यांमध्ये समन्वय नसेल, तर टास्क पूर्ण करणं अशक्य आहे. टीम वर्क या संकल्पनेमुळेच या गेममध्ये कॉर्पोरेट कंपनी आणि ऑफिस ग्रुप जास्त सहभागी होतात.



गेमचे टप्पे

लॉकआऊट - एका खोट्या केसमध्ये अडकवून तुमच्या ग्रुपला तुरुंगात टाकण्यात येतं. तुरुंगातून बाहेर पडण्याची एक संधी दिली जाते. ग्रुपनं प्लॅनिंग करून तुरुंगातून निसटणं आवश्यक असतं.

कॅबिन इन द वुड्स - एका रहस्यमय शापित जंगलात तुमच्या ग्रुपला सोडलं जातं. या जंगलात गेल्यावर पुन्हा बाहेर पडता येत नाही. यामागचं कारण तुम्हाला शोधायचं आहे.

अॅबडक्शन द पायनल अव्हर - तुम्ही नावाजलेले व्यक्तिमत्व आहात आणि तुम्हाला किडनॅप केलं आहे. तुम्हाला सोडवण्यासाठी राष्ट्रपतींना ब्लॅकमेल केलं जातंय. तुम्हाला एक प्लॅन करून इथून निसटायचं आहे.

द हर्ट लॉकर - या टास्कमध्ये तुम्हाला बॉम्ब निष्क्रिय करण्याचं चॅलेंज आहे. एक एक क्ल्यू शोधून तुम्हाला या बॉम्बपर्यंत पोहोचायचं आहे.

द कॉन ऑफ कोहिनूर अ मिशन इम्पॉसिबल - ब्रिटिश म्युझियममधला कोहिनूर डायमंड तुम्हाला प्लॅनिंग करून चोरी करायचा आहे.

आहे की नाही फुल ऑन अॅडव्हेंचरिस्ट गेम! सो तुम्ही फ्रेंड ग्रुपसोबत किंवा फॅमेलिसोबत जाऊन याची मजा घेऊ शकता. अधिक माहितीसाठी http://www.mysteryrooms.in/ या लिंकवर क्लिक करा.

कुठे? - वीरा देसाई इंडस्ट्रियल इस्टेटअंधेरी



हेही वाचा

वाईट सवयी सोडल्या नाहीत, तर हे वॉच देईल शॉक!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा