Advertisement

वाशीत कुत्र्यांसाठी होणार उद्यान

तीन महिन्यांत हे उद्यान तयार होणार असून तिथे श्वानांना फिरण्यासाठी कोणतेही शुल्क सध्यातरी आकारले जाणार नाही.

वाशीत कुत्र्यांसाठी होणार उद्यान
SHARES

नवी मुंबईतील वाशीमध्ये आता लवकरच कुत्र्यांसाठी उद्यान सुरू होणार आहे.  अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले वाशीतील श्वान उद्यानाचं काम अखेर मार्गी लागलं आहे. वाशीतील सेक्टर आठमधील वीर सावरकर उद्यानात श्वान उद्यान सुरू करण्यात येणार आहे. या उद्यानाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. 

तीन महिन्यांत हे उद्यान तयार होणार असून तिथे श्वानांना फिरण्यासाठी कोणतेही शुल्क सध्यातरी आकारले जाणार नाही. या उद्यानामध्ये कुत्र्यांसाठी खास व्यवस्था असणार आहे. येथे त्यांना मनसोक्तपणे बागडण्याचा आनंद त्यांना घेता येणार आहे. शिवाय त्यांच्यासाठी खास खेळणीही बसवली जाणार आहेत. हे उद्यान म्हणजे कुत्र्यांना फिरण्यासाठी, खेळण्यासाठी एक हक्काची जागा असणार आहे.

वाशी येथील स्थानिक माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांच्या पुढाकाराने नवी मुंबईतील या पहिल्या श्वान उद्यानाचं काम सुरू करण्यात आलं आहे. उद्यानातील एका बाजूला ८७० चौरस मीटर क्षेत्रातील जागेत हे उद्यान उभारलं जात आहे. या श्वान उद्यानाचा एकूण खर्च २६ लाख रुपये आहे.

नवी मुंबईत अनेक उद्याने आहेत. मात्र प्राण्यांसाठी एकही उद्यान नाही. शहरातील अनेक नागरिकांच्या घरी पाळीव श्वान आहेत. त्यांना बागेत घेऊन फिरायला घेऊन गेल्यावर त्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने अनेकांना त्रास सहन करावा लागतो. बागेत फिरायला येणारे अनेक जण यावर नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे खास श्वानांसाठी शहरात एक उद्यान असावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.



हेही वाचा -

World Health Day : निरोगी आरोग्यासाठी ९ सोप्या गोष्टी

मन करा रे कणखर!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा