मुंबईच्या रस्त्यांवर रात्री धावल्या सायकल

    मुंबई  -  

    मुंबई - मिड नाइट सायकलिंगचं आयोजन शनिवारी करण्यात आलं. यामध्ये मोठ्या संख्येने मुंबईकरांनी सहभाग घेतला. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तसंच दिवसा होणारी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी ही मिडनाइट सायकलिंग करण्यात आली. या प्रदूषणमुक्त मिड नाइट सायकलिंगची सुरुवात कुलाबापासून झाली. कुलाबा ते शिवाजीपार्क पुन्हा शिवाजी पार्क ते मरिन ड्राइव्हपर्यंत झालेल्या या मिडनाइट सायकलिंगमध्ये पुरुषांसह महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वाइल्ड रेंजर्सचे आयोजक रोशन दळवी यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सायकलस्वारांना अनेक सूचना दिल्या. रात्री उशिरा झालेल्या या मिड नाइट सायकलिंगने सर्वांचंच लक्ष वेधलं.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.