Advertisement

‘क्विर हग'तर्फे प्राईड मार्चचे आयोजन


‘क्विर हग'तर्फे प्राईड मार्चचे आयोजन
SHARES

ग्रँटरोड - येथील ऑगस्ट क्रांती मैदानात शनिवारी 'क्विर हग' संस्थेतर्फे तृतीयपंथींसाठी प्राईड मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 4500 तृतीयपंथी एकवटले होते. दुपारी 3 वाजता ऑगस्ट क्रांती मैदानातून सुरु झालेला प्राईड मार्च ग्रँट रोड स्टेशन, लॅमिगटन रोड आणि गिरगाव करत पुन्हा ऑगस्ट क्रांती मैदान असा काढण्यात आला. येथे अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. समलिंगीना हक्क मिळावे यासाठी या मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा