Advertisement

सॉल्ट थेरपी : सॉल्ट एस्केपमध्ये अनुभवा मुंबईतील नवीन स्पा थेरपी

नरिमन पॉईंट इथं चक्क मीठानं आश्चादित खोली तयार केली आहे आणि याचा उपयोग सॉल्ट थेरपीसाठी केला जातो. जाणून घ्या नेमकी काय आहे ही थेरपी आणि कुठे अनुभवाल ही थेरपी?

सॉल्ट थेरपी : सॉल्ट एस्केपमध्ये अनुभवा मुंबईतील नवीन स्पा थेरपी
SHARES

आहारातील महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. मिठाशिवाय अन्नाला चव नाही. म्हणूनच याला रसांचा राजा म्हणतात. नैसर्गिक मिठामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतं. असं हे मीठ जेवणात आपण वापरतोच. पण याशिवाय त्याचा वापर आपल्याला कदाचित माहीत नसेल. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की नरिमन पॉईंट इथं चक्क मिठानं आच्छादित खोली तयार केली आहे आणि याचा उपयोग सॉल्ट थेरपीसाठी केला जातो.

सॉल्ट एस्केप

नरिमन इथल्या 'सॉल्ट एस्केप'मध्ये सॉल्ट थेरपी दिली जाते. या थेरपीसाठी त्यांनी मिठानं आच्छादित अशी एक खोली तयार केली आहे. संपूर्ण खोलीत जिथे पाहाल तिथे तुम्हाला मीठच दिसेल. जमिनीवर, भिंतींवर आणि खोलीतल्या वातावरणात मीठच मीठ आहे. या मिठानं आच्छादित खोलीत तुम्हाला ६० मिनीटं ठेवलं जाईल.  


सॉल्ट थेरपी म्हणजे?

सॉल्ट थेरपी ही एक नॅचरल थेरपी आहे. यात कुठल्याही औषधांचा वापर केला जात नाही. यामध्ये व्यक्तीला मिठानं आच्छादित घरात किंवा जमिनीवर ठेवलं जातं. काही ठिकाणी तर मिठाचा वापर करून मसाज देखील केला जातो. हळूहळू हवेतील मीठ शरीरावाटे शोषलं जातं.

६० मिनिटांच्या थेरपीमध्ये खोलीमधील वातावरणात ओलावा असतो. तसंच तिथलं तापमान १८ ते २२ डिग्री सेल्सियस म्हणजेच थोडसं दमट ठेवण्यात येतं. ही थेरपी दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये करण्यात येते. ओली थेरपी आणि सुकी थेरपी. या थेरपीला हेलोथेरपी म्हणूनही ओळखलं जातं.


सॉल्ट थेरपीची गरज का?

बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य खुलवणं जास्त गरजेचं आहे. यासाठी ‘सॉल्ट थेरपी’ प्रभावी ठरते. घामामुळे अनेक प्रकारचं इन्फेक्शन आपल्याला होत असतं. त्यावर मीठ हा सर्वोत्तम उपाय आहे. मिठाच्या निर्जंतुक करणाऱ्या गुणाचा यावर उत्तम परिणाम होतो.


सॉल्ट थेरपीचे फायदे

) थेरपी दरम्यान मीठाचे कण श्वासामार्फत फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे संक्रमणापासून सुटका मिळते.

) सॉल्ट थेरपीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्वचेसंबंधीच्या समस्या, पिंपल्स, एक्जिमा, सोरायसिस सारख्या समस्यांवर थेरपी फायदेशीर आहे. तरीही तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेऊन ही थेरपी करू शकता.

) ज्यांचे स्नायू कमकुवत आहेत किंवा हाडांच्या वेदनांचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी सॉल्ट थेरपी फायदेशीर आहे.

) सॉल्ट थेरपी अस्थमा आणि ब्रोकायटिस सारखे आजार दूर करण्यासही मदत करते.

) सॉल्ट थेरपी चिंता, ताण आणि डिप्रेशन यांसारख्या मानसिक समस्या दूर करते.

) मीठामुळे डेड सेल्स हटून त्वचा मुलायम बनते.

) सॉल्ट थेरपी बल्ड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी मदत करते. यामुळे पिंपल्स, पुरळच्या समस्या दूर होतात.


तुम्हाला या थेरपीची गरज असेल तर सॉल्ट एस्केपमध्ये नक्की जा. सर्व प्रकारच्या स्क्रीनवर ही थेरपी फायदेशीर आहे. पण तुम्हाला या थेरपीबद्दल काही शंका असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला इथं जाण्याअगोदर घेऊ शकता.


कुठे : सॉल्ट एस्केप, हनुमान बिल्डींग, तळ मजला, ३०० पेरीन, नरिमन पॉईंट

किंमत : १ हजार ४०० रुपये

वेळ : सकाळी ९.३० ते रात्री ८.३०हेही वाचा

टेन्शन, नैराश्यातून बाहेर यायचंय? 'या' ७ टिप्स जरूर वाचा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा