Advertisement

टेन्शन, नैराश्यातून बाहेर यायचंय? 'या' ७ टिप्स जरूर वाचा

तुम्ही नोकरी करणारे असाल किंवा घर संभाळणारे असाल टेंशन हे सर्वांच्याय वाट्याला येतं. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्याच्या मदतीनं तुम्ही टेंशन आणि उदासिनता या दोन्हीवर मात करू शकता.

टेन्शन, नैराश्यातून बाहेर यायचंय? 'या' ७ टिप्स जरूर वाचा
SHARES

आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात. ऊन-सावली सारखं आयुष्यात कधी दु:ख कधी सुख: असं चालतच असतं. सुखाच्या क्षणात आपण आनंदी असतो. मात्र दुखाचा क्षणी आपला हिरमोड होतो आणि एकच प्रश्न आपल्या मनात डोकावत असतो तो म्हणजे मीच का? काहींची सहन करण्याची शक्ती इतकी कमी असते की ते छोट्या-छोट्या समस्यांचं खूप टेन्शन घेतात. अगदी कुणी काही बोललं तरी मनानं ते दुखावले जातात.

तुम्ही नोकरी करणारे असाल किंवा घर संभाळणारे असाल टेन्शन हे सर्वांच्याच वाट्याला येतं. वाढत्या टेन्शनच्या बोज्यानं अनेकांचा हिरमोड होतो. हळूहळू आपण उदास राहू लागतो. याच उदासवाण्या मानसिकतेतून बाहेर पडणं फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्याच्या मदतीनं तुम्ही टेन्शन आणि उदासीनता या दोन्हीवर मात करू शकता.

) कुठल्याही कारणास्तव मन उदास असेल किंवा टेन्शनमध्ये असाल तर कॉमेडी शो, चित्रपट पाहणं फायदेशीर ठरेल. कॉमेडी शो किंवा चित्रपट पाहिल्यानं तुमचा मूड चांगला होऊ शकतो. हसल्यानं तुमच्यातील नकारात्मक गोष्टी बाहेर पडतील.

) संगीत हा देखील टेन्शन आणि उदासीनतेवर एक उत्तम पर्याय आहे. संगीत ऐकल्यानं मनातील उदासीनता दूर होते. थोडा वेळ का होईना पण नैराश्याचं मळभ आपल्या मनातून निघून जातो. संगीताच्या तालावर आपले पाय आपोआप थिरकू लागतात. मूड फ्रेश होतो. प्रसन्न वाटायला लागतं.

) मेडिटेशन करून तुम्ही स्वत:वर आणि स्वत:च्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवू शकता. मेडिटेशनमुळे तुम्हाला मन:शांती लाभेल. त्यामुळे एका शांत जागी बसा आणि डोळे मिटून ५-१० मिनिटं मेडिटेशन करा. दिवसातून ३ ते ४ वेळा अशाच प्रकारे मेडिटेशन करा.


हातानं नाही तर पायानं चित्र साकारणारे चित्रकार


) मूड खराब असेल किंवा कुठल्या टेन्शनमध्ये असाल तर तुमच्या आवडीचे पदार्थ खा. कुकिंगची आवड असेल तर एखादा चांगला पदार्थ स्वत:च्या हातानं बनवा. यामुळे तुमचं लक्ष दुसरीकडे केंद्रीत होईल आणि मनात नकारात्मक विचार येणार नाहीत.

) टेन्शनमध्ये आपली विचार करण्याची क्षमता कमकुवत होते. यामुळे अनेकदा आपण नको ते पाऊल उचलतो आणि नंतर पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. त्यामुळे कुठलाही टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी शांत विचार करा.

) घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासोबत गेम खेळा. गरजेचं नाही की मैदानीच गेम खेळायला हवेत. तुम्ही घरच्या घरी सापशिडी, व्यापार, बुद्धीबळ असे गेम देखील खेळू शकता. यामुळे तुमचा मूड चेंज होईल. टेन्शनपासून तुमचं लक्ष दुसरीकडे केंद्रीत होईल.

) टेन्शन असेल किंवा मूड खराब असेल तेव्हा वाचन करा. कुठलंही पुस्तक घ्या आणि वाचा. हलकी-फुलकी पुस्तकं तुमचं मनोरंजन करतील. शिवाय पुस्तकं तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतील. तुमच्या समस्यांवर मात करून आनंदी कसं राहायचं हे तुम्ही पुस्तकं वाचून शिकू शकता.  हेही वाचा -

वाचाल तर वाचाल : ही '५' मराठी पुस्तकं तुमचा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतील

मुंबईतल्या या ५ वॉटर पार्कमध्ये अनुभवा मज्जा, मस्ती आणि थ्रील
संबंधित विषय
Advertisement