Advertisement

मुंबईतल्या या ५ वॉटर पार्कमध्ये अनुभवा मज्जा, मस्ती आणि थ्रील

लांब जाण्यापेक्षा एक दिवसाची सहल करावी असे प्लॅन विकेंड आले की ठरायला लागतात. पण जायचं कुठे? असा प्रश्न देखील पडतो. टेंशन कशाला घेताय. तुमची ही समस्या आम्ही सोडवतो. मुंबईतील या वॉटर पार्क्समध्ये होईल की वन डे पिकनिक.

मुंबईतल्या या ५ वॉटर पार्कमध्ये अनुभवा मज्जा, मस्ती आणि थ्रील
SHARES

लागोपाठ सुट्ट्या आल्या की वेगवेगळे ग्रुप्स, फॅमिली कुठेना कुठे पिकनिकला जाण्याचा प्लॅन करतात.  दहीहंडी शनिवारी असून त्याला लागूनच रविवारची सुट्टी आल्यानं कुठे तरी जायचा बेच चालला असेल. लांब जाण्यापेक्षा एक दिवसाची सहल करावी असं काही तरी ठरत असेलही. पण जायचं कुठे? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. टेंशन कशाला घेताय. तुमची ही समस्या आम्ही सोडवतो. आम्ही तुम्हाला अशाच ५ वॉटर पार्कची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही वन डे पिकनिक करू शकता. 


) अॅक्वा इमॅजिका, खोपोली

अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका हे देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचे वॉटर पार्क आहे. वॉटर पार्कमध्ये एकूण १४ राईड्स आहेत. लहानांपासून ते अगदी मोठयांपर्यंत सर्वच वेगवेगळया राईडसचा आनंद तुम्ही इथं लुटू शकतात.


कुठे : ३०/३१, खोपोली-पाली रोड, एसएच ९२, रायगड

कसे पोहोचाल : अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका मुंबई आणि पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन तुम्ही इथं सहज पोहोचू शकता. खालापूर टोल नाक्यापासून इमॅजिका वॉटर पार्क ४ किलोमीटर अंतरावर आहे.


किंमत : ५९९ रु. पासून सुरुवात ( विकेंडमध्ये किंमत वाढण्याची शक्यता)

वेळ : सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.००

तिकीट बुक करण्यासाठी : https://www.adlabsimagica.com/water-park/


) सुरज वॉटर पार्क, ठाणे

मुंबई आणि ठाण्यापासून अत्यंत जवळ असं हे ठिकाण आहे. ठाण्यापासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर हे वॉटर पार्क आहे. वॉटर पार्कला वेगवेगळ्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. ११ एकरमध्ये पसरलेल्या या वॉटर पार्कमध्ये लहानांपासून मोठयांसाठी वेगवेगळया राईड्स उपलब्ध आहेत.


कुठे : एमएच एसएच ४२, डोंगरीपाडा, ठाणे 

कसे पोहोचाल : ठाणे पश्चिमेला घोडबंदर रोडवर हे वॉटर पार्क आहेमध्य रेल्वे मार्गावरुन ट्रेन पकडल्यानंतर ठाण्यात उतरा. तिथून सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसनं किंवा रिक्षानं तुम्ही सूरज वॉटर पार्कला सहज पोहोचू शकता. ठाणे स्टेशनपासून सात किलोमीटर आणि बोरीवलीपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे.

किंमत : ६५० रु. (लहानांसाठी) ८०० रु. (मोठ्यांसाठी)


वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ६

तिकीट बुक करण्यासाठी : http://www.surajwaterpark.com


) वॉटर किंगडम, बोरीवली

वॉटर किंगडम हे थीमवर आधारीत आशियातील सर्वात मोठं वॉटर पार्क आहे. मुख्य म्हणजे मुंबईपासून हे अत्यंत जवळ असलेलं वॉटर पार्क आहे. इथे लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वच वेगवेगळया राईडसचा आनंद लुटू शकतात. महत्वाच म्हणजे हे वॉटर पार्क मुंबईच्या जवळ असल्यामुळे तुमचा प्रवासाचा भरपूर वेळ वाचतो. बोरीवली पश्चिमेला एस्सेल वर्ल्डच्या बाजूलाच हे वॉटर पार्क आहे.


कुठे : ग्लोबल पागोडा रोड, एस्सेल वर्ल्ड पार्कच्या बाजूला, बोरीवली

कसे पोहोचाल : वेर्स्टन एक्सप्रेस हायवे किंवा मीरा-भाईंदर मार्गानं तुम्ही जाऊ शकता. ट्रेनने बोरीवली स्टेशनवर उतरल्यानंतर तिथून बसनं गोराईला जा. गोराई जेट्टीवरुन एस्सेल वर्ल्डची बोट तुम्हाला वॉटर किंगडमला घेऊन जाईल.

किंमत : ९२० रु. ( मोठ्यांसाठी), ६५० रु. (लहानांसाठी)

वेळ : सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६.३०

तिकीट बुक करण्यासाठी : http://www.waterkingdom.in/travel/home


) टिकूजी नी वाडी वॉटर पार्क

ठाण्यातील आणखी एक वॉटर पार्क म्हणजे टिकूजी नी वाडी. ठाण्यात घोडबंदर रोडवरच कोकणीपाडा इथं हे पार्क आहे. इथं सुद्धा सर्वांना वनडे पिकनिकचा मनमुराद आनंद लुटता येईल अशा राईडस आहेत.


कुठे : टिकूजी नी वाडी रोड, टाटा पॉवर हाऊसच्या समोर, मनपाडा, ठाणे

कसे पोहोचाल : ठाणे घोडबंदर रोडवर मानपाडा टाटा पॉवर हाऊसच्या विरुद्ध दिशेला टिकूजी नी वाडी वॉटर पार्क आहे. इर्स्टन एक्स्प्रेस तसंच ट्रेननं ठाण्याला पोहोचल्यानंतर तुम्ही इथे सहज येऊ शकता.

किंमत : ६०० ते ७०० रु. ( विकेंडला किंमत वाढण्याची शक्यता)

वेळ : सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०

तिकीट बुक करण्यासाठी : https://www.tikuji-ni-wadi.com/


) ग्रेट एस्केप वॉटर पार्क


मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पारोल-भिवंडी रोडवर विरार पूर्वेला हे वॉटर पार्क आहे. ग्रेट एस्केप वॉटर पार्कही ग्रुप्स आणि फॅमिली पिकनिकसाठी उत्तम स्पॉट आहे. इथंही तुम्ही वेगवेगळया राईडसमध्ये पाण्यात खेळण्याचा आनंद लुटू शकता.


कुठे : ग्रेट इसकॅप वॉटर पार्क रोड, वजरेशवरी रोडच्या विरुद्ध, विरार

कसे पोहोचाल : पश्चिम रेल्वेमार्गावरुन लोकल ट्रेन पकडल्यानंतर वसई स्टेशनला उतरा. वसई पश्चिमेकडून रिक्षा पकडून तुम्ही थेट ग्रेट एस्केप वॉटर पार्कला येऊ शकता.

किंमत : ८९९ ( मोठ्यांसाठी), ७४९ ( लहानांसाठी)

वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ६

तिकीट बुक करण्यासाठी : https://greatescape.co.in/



हेही वाचा

पिकनिकला जाताय? मग या '१२' गोष्टी लक्षात ठेवा आणि दुर्घटना टाळा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा