Advertisement

पिकनिकला जाताय? मग या '१२' गोष्टी लक्षात ठेवा आणि दुर्घटना टाळा

पावसाळी पिकनिकला जाताना दुर्घटना घडून मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी कानावर येत असतात. पण जर खबरदारी घेतली तर या दुर्घटनांना आळा घालता येऊ शकतो.

पिकनिकला जाताय? मग या '१२' गोष्टी लक्षात ठेवा आणि दुर्घटना टाळा
SHARES

पावसाळ्यात आपण सर्वच वेगवेगळ्या ठिकाणी पिकनिकला जात असतो. धबधब्यांची मजा लुटणे, किल्ल्यांची सफर, ट्रेकिंग असे अनेक प्लॅन प्रत्येकाचे असतातच. तुमचा प्लॅन कुठलाही असो, पण अशा ठिकाणी जाताना काळजी घेणं फार आवश्यक आहे. पावसाळी पिकनिकला जाताना दुर्घटना घडून मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी कानावर येत असतात. पण जर खबरदारी घेतली तर या दुर्घटनांना आळा घालता येऊ शकतो. पर्यटनस्थळी गेल्यावर नेमकी काय काळजी घेतली पाहिजे याच्या काही टिप्स देणार आहोत.


) निसर्ग सौंदर्यानं बहरलेल्या या रमनीय पर्यटनस्थळाचे सौंदर्य जपणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे इथं धिंगाणा करणं आणि निसर्गास बाधा पोहोचेल, असं कोणतेही कृत्य करू नका.

) पायवाटेनं जाताना काळजी घ्या. निसरड्या ठिकाणी पाय घसरण्याची शक्यता आहे.


) डोंगर चढताना वा उतरताना जपून चालावे. पाय घसरून अपघात होण्याची शक्यता असते. डोंगर उताराची वाट थोडी अवघड आहे. त्यामुळे तिथे जरा जपून चालावं. असा वेळी चांगल्या दर्जाचे शूज घालावेत.


) धबधब्याच्या ठिकाणी मद्यप्राशन करणं गैर आहे. अशावेळी एखादा अपघात होऊ शकतो किंवा तुमच्यामुळे दुसऱ्यांना इजा होऊ शकते

) अपरिचित ठिकाणी जाताना गावातील एखादा मार्गदर्शक आवर्जून सोबतीला न्यावा. पावसाळ्यात आणि धुक्यामध्ये वाट हरवण्याची शक्यता असते.

) नदी, ओढे, ओहोळ ओलांडण्यापूर्वी गावकऱ्यांकडून इथल्या पाण्याबद्दल माहिती करून घ्या. डोंगरात पावसाचा जोर वाढला की छोटे ओढेदेखील दुथडी भरून वाहू लागतात. शहरी लोकांना त्याची कल्पना नसते.

) अंतर्गत भागात प्रवास करताना अनेक ठिकाणी नदीच्या छोटय़ा पात्रावर छोटे छोटे पूल असतात. वाढत्या पावसात नदी पुलावरून ओसंडून वाहत असते. अशावेळी वेडे साहस करून त्यावरून गाडी घेऊन जाऊ नये. स्थानिकांच्या मार्गदर्शनाशिवाय असे पूल पार करू नये.

) डोंगरात कुठेही जात असाल तर पायथ्याच्या गावातील गावकऱ्यांना तुम्ही कुठे जाताय, केव्हापर्यंत येणार आहात याची कल्पना द्यावी. शक्य असल्यास स्थानिकांचे मोबाईल क्रमांक नोंदवून घ्यावे. आणि परत जाताना गावकऱ्यांना आपण जात असल्याची कल्पना देखील द्यावी.

) ग्रुपमधील सर्वाचे मोबाईल सुरू ठेवून बॅटरी संपू शकते. काही प्रसंग उद्भवलाच तर बॅटरीविना संपर्क साधणे कठीण होऊ शकते.

१०) सततच्या पावसामुळे धबधब्याच्या ठिकाणी खडकावर शेवाळे तयार होण्याचा संभव असतो. अशा ठिकाणी अत्यंत सावधपणे वावरावे.

११) आपण सोबत नेलेल्या सर्व प्लास्टिक, थर्माकोल अथवा अन्य वस्तू आपल्यासोबत परत आणून शहरामध्ये त्याची विल्हेवाट लावावी.

१२) सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकण्यासाठी चित्रविचित्र अंगविक्षेप करून जीवावर बेतेल (कडय़ाच्या टोकावर जाणे, समुद्रात जाणे, धबधब्याच्या माथ्यावर जाणे) असे प्रकार करू नये.



हेही वाचा

मुंबईजवळील या '५' धबधब्यांवर लुटा मनमुराद आनंद

पावसाळ्यात फिरायला जायचंय? मग या ५ ठिकाणी अनुभवा मजा, मस्ती आणि थ्रिल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा