Advertisement

वाचाल तर वाचाल : ही '५' मराठी पुस्तकं तुमचा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतील

आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तकांचा मोठा वाटा असतो. सर्वांनी वाचनाचा छंद जोपासून पुस्तकांना आपले मित्र करण्यावर भर दिला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशीच काही मराठी पुस्तकं सांगणार आहोत जी तुम्ही आयुष्यात एकदा तरी वाचलीच पाहिजेत.

वाचाल तर वाचाल : ही '५' मराठी पुस्तकं तुमचा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतील
SHARES

प्रत्येकाला मित्र हा असतोच, जो आपल्याशी बोलतो, आपल्या सोबत खेळतो, भांडतो वगैरे. पण अशीही मित्र असतात जी न बोलता आपल्याशी संवाद साधतात. आपल्या मनातील गोष्ट पारखून घेतात ती म्हणजे पुस्तकं. असंख्य विषयांची पुस्तकं आपल्याला आयुष्य कसं जगावं? याचं ज्ञान देत असतात

आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तकांचा मोठा वाटा असतो. सर्वांनी वाचनाचा छंद जोपासून पुस्तकांना आपले मित्र करण्यावर भर दिला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशीच काही मराठी पुस्तकं सांगणार आहोत जी तुम्ही आयुष्यात एकदा तरी वाचलीच पाहिजेत. या पुस्तकांमुळे तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.


) श्रीमानयोगी

स्वामी’नंतर रणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्त्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू या सर्व विशेषणांमधील महाराजांच्या तोडीची दुसरी व्यक्ती आढळत नाही. महाराजांचे राजकीय कर्तृत्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे


या कादंबरीत महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा होणारा विकास क्रमाक्रमानं मांडण्यात आला आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्‌मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचं श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचं आहे.

पुस्तक : श्रीमानयोगी

लेखक : रणजित देसाई 

साहित्य प्रकार : कादंबरी

प्रकाशन संस्था : मेहता पब्लिकेशन हाऊस, पुणे


) शाळा

शाळा ही मिलिंद बोकील यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. साधारणत: १९७५ साली, इयत्ता नववीत शिकणाऱ्या, पौंगडावस्थेतल्या चार शाळकरी मित्रांच्या आयुष्यात त्या एका वर्षात घडलेल्या घटनांभोवती कादंबरीचा पट विणला आहे


कादंबरीत शाळेत आणि कथानायकाच्या चाळीत घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगानं १९७५ साली भारतात लागू झालेल्या देशांतर्गत आणीबाणीचेदेखील संदर्भ येतात. या कादंबरीवर २०१२ साली मराठी चित्रपट देखील बनवण्यात आला आहे. पण चित्रपट पाहण्यापेक्षा पुस्तक वाचण्यात खरी मजा आहे. कदाचित तुमच्या शाळेतल्या आठवणी पुन्हा ताज्या होतील.

पुस्तक : शाळा

लेखक : मिलिंद बोकील

साहित्य प्रकार : कादंबरी

प्रकाशन संस्था : मौज प्रकाशन


) इडली, ऑर्किड आणि मी

विठ्ठल कामत यांचं ‘इडली, ऑर्किड आणि मी’ हे पुस्तक तरुण उद्योजकांसाठी तसंच उद्योजक होण्याची इच्छा असलेल्यांसाठी प्रेरणादायी आहे. प्रसिद्ध ‘ऑर्किड’ या फाइव्ह स्टार हॉटेल्सचे मालक विठ्ठल कामत यांचे अनुभव कथन यात आहे.

एका सामान्य घरातल्या मुलाच्या करिअरच्या यशाचा प्रवास म्हणजे हे पुस्तक आहे असं म्हणायला हरकत नाही. या पुस्तकात विठ्ठल कामत त्यांच्या जीवनाबद्दलचा, करिअरबद्दलचा दृष्टिकोन सहज-सोप्या शैलीत रंजकपणे मांडतात. एका साध्या रेस्टॉरंटवाल्याचा मुलगा जगप्रसिद्ध इको फ्रेंडली फाइव्ह स्टार ऑर्किड हॉटेल्स चेन्सचा मालक कसा होतो याचा प्रवास वाचताना आपण थक्क होतो. आणि आपणही हे करू शकतो अशी सकारात्मक दिशा आपल्याला मिळते.

पुस्तक : इडली, ऑर्किड आणि मी

लेखक : विठ्ठल कामंत

साहित्य प्रकार : आत्मचरित्र

प्रकाशन संस्था : मॅजेस्टिक प्रकाशन


) ययाती

ययाती ही वि. . खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या आणि भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे याची जाणीव होते.

पुस्तक : ययाती

लेखक : वि. . खांडेकर

साहित्य प्रकार : कादंबरी


) अग्निपंख

तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी १९३१ मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम.

या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूनं आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे.

पुस्तक : अग्निपंख

लेखक :  डॉ. ए पी जे अब्दुल कलाम

साहित्य प्रकार : आत्मचरित्र

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा