Advertisement

सारखा सेल्फी काढताय? जरा सावधान...


सारखा सेल्फी काढताय? जरा सावधान...
SHARES

मुंबई - सध्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना वेड लागलंय ते सेल्फीचं. मित्र-मैत्रिणी भेटले, हॉटेलमध्ये गेले, वा एखाद्या वाढदिवसाची पार्टी... या सगळ्याच वेळी सेल्फी मस्टच. इतकंच काय ट्रेकिंग करतानाही सेल्फी काढण्याचा अनेकांना मोह आवरत नाही. पण तुम्ही सारखे सेल्फी घेत असाल, तर सावधान... कारण हे एखाद्या मानसिक रोगाचं लक्षणही असू शकतं.
डॉक्टरांच्या मते, सेल्फीमुळे लोक आत्मकेंद्री बनतात. तसंच स्वत:ला सुंदर दाखवण्याच्या प्रयत्नात तुम्ही आभासी जगात वावरू लागता. शिवाय तुमच्या कामावर आणि शिकण्याच्या क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. यातून तुम्ही जाऊ शकता नैराश्याच्या गर्तेत...
मनोविकारतज्ज्ञ डॉ. आरती आनंद यांच्या मते, तरुण वयात सेल्फी घेण्याची सवयच लागली, तर तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. तसंच कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला पुढे जाण्यातही अडथळे निर्माण होतात.
तेव्हा सेल्फीला भले समाजमान्यता असेल... पण वारंवार सेल्फी घेण्याची सवय मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम करेल, हे लक्षात असू द्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा