Advertisement

हा खेळ सावल्यांचा...शॅडो पपेट्सची अनोखी कला!


हा खेळ सावल्यांचा...शॅडो पपेट्सची अनोखी कला!
SHARES

दिम काळात मनोरंजनाची ज्यावेळी साधनंच नव्हती, त्यावेळी कल्पनेला भरारी देत एक संपन्न कला बहरली होती. ही कला म्हणजे 'शॅडो पपेट्स'! आपण ज्याला बाहुल्यांच्या सावल्यांचा खेळ म्हणूनही ओळखतो. ही कला प्राचीन काळी लोकप्रिय होती. एखादी कथा सादर करण्यासाठी या कलेचा वापर केला जायचा. पण आज इंटरनेटच्या जमान्यात ही कला इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.



पण अशा परिस्थितीत देखील असे अवलिया आहेत जे ही कला जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे आर्टिस्ट, फोटोग्राफर आणि फिल्ममेकर शॉन लुईस. पारंपरिक कला जोपासताना ४०० वर्षांपूर्वीच्या बाहुल्याच नव्हे, तर चित्रकथी आणि ऐतिहासिक साहित्याचा ठेवा शॉन लुईसनं जपला आहे. याशिवाय ही कला लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी शॉननं 'शॅडो पपेट्स' या खेळाचं वर्कशॉप आयोजित केलं आहे. ७ मे पासून सुरू झालेलं हे वर्कशॉप १२ मेपर्यंत असणार आहे.



शॅडो पपेट्स या वर्कशॉपच्या माध्यमातून मी प्राचीन कला जतन करण्याचा प्रयत्न करत आहे. या वर्कशॉपला पपेट्स तयार करण्यापासून ते त्याचे खेळ करण्यापर्यंत सर्व गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. स्टोरी तयार करणं, व्यक्तीचित्रण करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईट्स शिकवले जाणार आहेत. आम्ही सध्या लेदर आणि प्लॅस्टिक अशा दोन्ही पद्धतीचे पपेट्स शिकवत आहोत.

शॉन लुईसआर्टिस्ट



शॅडो पपेट्स खेळ काय आहे?

शेडॉ पपेट्स या खेळासाठी जे पपेट्स वापरले जातात, ते लेदरचे (चामडे) असतात. चामड्याच्या तुकड्याला खूप घासून पारदर्शक पापुद्र्यासारखे केले जाते. इतके की त्यातून पलिकडला धुरकट प्रकाश दिसू शकतो.



उदाहरण म्हणून हत्ती घ्या. हत्तीचं चित्र चामड्यावर काढलं जातं. आता त्याचे चार पाय, भलेमोठे पोट, डोके आणि हत्तीची सर्वात जास्त हलणारी लवचिक पण शक्तीशाली सोंड कापली जाते. चित्रातील सोंडेला पाच-सहा तुकड्यांमध्ये कापले जाते. त्यावर पेटत्या अगरबत्तीनं छिद्र पाडत नक्षी केली जाते. त्यानंतर हे सर्व अवयव एकमेकांना दोऱ्यानं बांधले जातात. या प्राण्याच्या मागच्या बाजूला दोन किंवा तीन काठ्यांनी आधार दिला जातो. यासाठी तुम्ही कुल्फीच्या काट्यांचा वापर करू शकता. याच काठ्या हातानं धरून पपेट्स पडद्यावर नाचवले जातात. मागच्या प्रखर दिव्यांमुळे पडद्यावर या पपेट्सची रंगीत सावली पडते. या सावल्यांच्या माध्यमातून प्रेक्षक पडद्यावर ही कथा पाहातात.



प्राचीन कला लोप पावतेय?

दक्षिण भारतात पपेट्सची खूप मोठी परंपरा आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात देखील तालासुरात, त्यांच्या भाषेत मुख्यत्वे रामायण आणि महाभारत सांगितले जाते. खरंतर ही परंपरा ५००० वर्षापर्यंत, अगदी महाभारत काळापर्यंत मागे जाते. आपल्याकडे राजस्थानात पडद्यावर सावल्या पाडून बाहुल्यांचे, प्राण्यांचे खेळ करण्याची प्रथा आहे. काठीवर नाचवली जाणारी रॉड पपेट किंवा हातावर चालवले जाणारे काळे हॅण्ड पपेट ही कला आजही काही प्रमाणात टिकून आहे.


जर तुम्हाला देखील शॅडो पपेट्स ही कला शिकायची असेल, तर या वर्कशॉपला हजेरी लावू शकता. यासाठी तुम्हाला ३००० रुपये मोजावे लागतील. त्यासाठी कालाघोडा इथल्या आर्टिसन्स या जागी तुम्हाला ५ नंतर पोहोचणं आवश्यक आहे. जर हे वर्कशॉप मिस झालं असेल, तर शॉन असे अनेक वर्कशॉप घेतच असतो!




हेही वाचा

डोंबिवलीचे 'सह्याजीराव' ९००० सह्यांचे धनी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा