मरिन ड्राईव्हवर मुंबईकरांनी घेतले योगाचे धडे

मरिन ड्राईव्ह - रविवारी आयोजित केलेल्या योगा शिबिराला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 'लव्ह मुंबई'च्या विश्वस्त आणि भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी या योग शिबिराचे आयोजन केले होते.

मुंबईकरांचं जीवन हे घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावत असतं. त्यांच्या या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त जीवन कसे जगावे याबाबत एस. व्यास विद्यापीठाचे कुलगुरू आणि ज्यांनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना योगाचे धडे दिले ते डॉ. एच. नागेंद्र यांनी तणाव मुक्त जीवन कसे जगता येईल? याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. निवेदिता श्रेयन्स यांनी देखील ध्यानधारणेविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. 


देशात सध्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हे चिंताजनक असून मधुमेहाला देशातून हद्दपार करण्यासाठी योगाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करत असल्याचे डॉ. नरेंद्र यांनी सांगितले. 

पूर्वी योगा शिकण्यासाठी आम्हाला नागरिकांना आमंत्रित करावे लागत होते. मात्र गेल्या 3 वर्षांपासून नागरिक स्वतः योगा सरावाला पुढे येत आहेत. पंतप्रधान त्यांच्या व्यस्त जीवनशैलीतून दररोज एक तास योगा करतात. त्याप्रमाणे नागरिकांनी देखील वेळ काढून तणावमुक्त जीवन आणि सुदृढ निरोगी आरोग्यासाठी योगा करणे गरजेचे असल्याचे डॉ. नरेंद्र यांनी सांगितलं.

Loading Comments