अशी ही एक रात्रबाजारपेठ


  • अशी ही एक रात्रबाजारपेठ
SHARE

मोहम्मद अली रोड - मोहम्मद अली रोडवरचा रात्रीचा बाजार. आणि हा बाजार एखाद्या जत्रेपेक्षा कमीही नाही. खेळणी, कपडे, पर्स... अगदी खाण्यापिण्याचे पदार्थ असं सब कुछ तुम्हाला इथे मिळू शकेल. दिवसा एखाद्या बाजारात असावी तशीच लगबग या रात्रबाजारातही असते. आणि हो, खवय्यांसाठी, त्यातही नॉन व्हेजप्रेमींसाठी मात्र इथे चांगलीच मेजवानी असते. कबाब, तंदुरी, खिमा-पाव, बिर्यानी... भरपेट खाल्ल्यावर तोंड गोड करावसं वाटलं, तर वेगवेगळ्या मिठायाही तुमच्यासाठी सज्ज असतात.

तर असा आहे हा रात्रीचा बाजार. मुंबईला कधीही न झोपणारं शहर का म्हणतात ते स्पष्ट करणारा.

संबंधित विषय
ताज्या बातम्या