नातं बहिण भावाचं

 Pali Hill
नातं बहिण भावाचं
नातं बहिण भावाचं
See all

मुंबई - कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया असंही नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानंही प्रसिद्ध आहे. प्रचलित कथेप्रमाणे या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असं नाव मिळालं. भाऊबीजेचा हा सण भावा-बहिणीच्या मायेचा सण आहे. या दिवशी बहिणीनं सकाळी उठल्यावर विष्णू-श्रीगणेशाचं पूजन करावं. मग घरी आलेल्या भावाला कुंकुमतिलक लावून औक्षण करावं. यंदा दुपारी 1 वाजून 9 मिनिटांपासून 3 वाजून 20 मिनिटांपर्यंत औक्षणासाठी शुभवेळ आहे. भाऊ या दिवशी बहिणीच्या घरी भोजन करतो, तिला भेटवस्तू देतो. सासरी गेलेल्या बहिणीला माहेरहून आलेल्या भावाच्या भेटीमुळे खूप आनंद होतो.

Loading Comments