Advertisement

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात


रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात
SHARES

उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते रणरणतं उन आणि सावलीसाठी व्याकुळ झालेली माणसं. पण याच कडाक्याच्या उन्हातही निसर्गाने काही झाडांना बहरण्याचं वरदान दिलं आहे. मुंबईतल्या रस्त्यांवर सध्या ही विविधरंगी फुलं बहरली आहेत. ही फुलं मुंबईतल्या रस्त्यांची शोभा आणखीन वाढवत आहेत. उन्हाळ्यात हिरवळ कमी झाली असली तरी उन्हाळी फुलझाडं बहारदार दिसत आहेत.

वसंत ऋतू हा महत्त्वाचा ऋतू आहे. या वसंत ऋतूमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात रंगीबेरंगी फुलं उमलतात. गुलमोहर, घंटी फूल, संकासूर अशी हंगामी फुलं या दोन महिन्यात येतात. झाडावरची लाल, निळी, पिवळी आणि गुलाबी फुलं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

घंटी फुल 

घंटी फुलाचा रंग पिवळा असतो. त्यामुळे हे फुल 'यल्लो बेल्स' या नावानेही ओळखले जाते. उन्हाळ्याच्या मोसमात ही फुलं बहरतात. ही फुलं दोन इंच लांब आणि तुतारीच्या आकाराची असतात.

प्रकार - झुडुप

कुठे - दादर, माहीम आणि दादर ते सांताक्रुझ

संकासूर






संकासूर ही फुलं झाडावर ३ मीटरच्या उंचीवर येतात. गुलमोहरच्या तुलनेत ही फुलं आकाराने लहान असतात. ही झाडं बहुतांश निवासी भागात आढळतात. जास्त करून लाल आणि नारंगी रंगाची फुलं पहायला मिळतात. पण एकाच प्रकारची पिवळी फुलंही तुम्हाला आढळतील.

प्रकार - झुडुप

कुठे पाहायला मिळतील - पश्चिम उपनगरांत

बोगन वेल

रस्त्याच्या कडेला सध्या बहरलेल्या या बोगन वेली आपल्या सौदर्याने मन मोहून टाकत आहेत. या वेली घराच्या प्रवेश दारावरच्या भिंतीवर किंवा बंगल्यांच्या कुंपणावर बहरलेल्या असतात. ही फुले दिसायला कागदासारखी असली तरी ती दिसायला आकर्षक असतात.

पांढरा, गुलाबी, पिवळा, अबोली अशा रंगांमध्ये ही फुलं आढळतात. या फुलांना सुगंध नसतो. केवळ शोभेसाठी म्हणून यांचा जन्म असतो. पावसाळी हंगाम सोडला तर बाकी आठ महिने ही फुलं बहरतात.

प्रकार - झुडुप
कुठे पाहायला मिळतील - साने गुरुजी उद्यान येथील सिद्धिविनायक मंदिर, युनिवर्सिटी रोड

बहावा

कॅसिया फिस्टुला हे बहावाचे शास्त्रीय नाव आहे. या झाडाची उंची ४൦ फुटांपर्यंत असू शकते. बहाव्याला पिवळ्या रंगाची फुलं येतात. झाडाला जणू पिवळ्या रंगाचे झुंबर लटकावेत अशी ही फुलं झाडावर बहरलेली असतात. यात फुलांच्या गुच्छांमध्ये कळ्या आणि फुलं असे दोन्ही प्रकार आढळतात. 

या फुलांचा रंग पिवळा असतो. पण राणीच्या बागेत असलेल्या बहावा फुलांचा रंग पांढरा आहे. रात्री बहाव्याच्या फुलांचा मंद सुगंध तुम्हाला मंत्रमुग्ध करतो. खास करून या फुलांचा रंग मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करतो. दक्षिण भारतात या फुलांना सोन्याचे म्हणजे वैभवाचे प्रतिक मानतात. भारत सरकारच्या टपाल खात्यानं बहावाच्या फुलांचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीट काढले आहे.

प्रकार - झाड
कुठे पाहायला मिळतील - आयआयटी पवई कँम्पस, गोदरेज कॅम्पस आणि विक्रोळी

एरंड














एरंडीचे झाड तीस मीटरपर्यंत वाढते. जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये एरंडीच्या बिया लावल्या जातात. १५൦ ते १८൦ दिवसांमध्ये एरंडीचे झाड पूर्ण वाढले की त्याच्या बिया मिळतात. याची पाने, बिया आणि मूळांचा औषधी वनस्पती म्हणून वापर केला जातो. यापासूनच एरंडलचे तेल बनवले जाते.

प्रकार - झुडुप
कुठे पाहायला मिळतील - पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर

गुलमोहर

गुलमोहर हे जगातील सुंदर झाड म्हणून ओळखले जाते. रणरणत्या उन्हातही फुलणारा हा वृक्ष आहे. हे झाड झटपट वाढते. अंदाजे ३൦ ते ४൦ फूट उंचीपर्यंत हे झाड वाढते. एप्रिल आणि मे महिन्यातच ही फुले बहरतात. गुलमोहरच्या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे याची एक पाकळी इतर पाकळ्यांहून वेगळी असते. एक पाकळी रंगाने पिवळी असते आणि त्यावर लाल रेषा असतात. तर इतर पाकळ्या लाल-केसरी रंगाच्या असतात. त्यामुळे ही फुले आणखीन आकर्षक दिसतात. 

गुलमोहराचे झाड सर्वप्रथम मुंबईत आढळले होते. एस.एस.एडवर्डस या शास्त्रज्ञाने १८४൦ मध्ये तयार केलेल्या 'गॅजेटियर ऑफ बॉम्बे सिटी अँड इज्यालँड' या वनस्पतीवर आधारीत पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

प्रकार - झाड
कुठे पाहायला मिळतील - एप्रिल आणि मे महिन्यामध्ये संपूर्ण मुंबईत हे फूल बहरते

पिवळा गुलमोहर

पिवळा गुलमोहर म्हणून या झाडाची खरी ओळख असली तरी शास्त्रीय भाषेत या झाडाला पेल्टोफोरम असे संबोधले जाते. गुलमोहरच्याच प्रकारात या झाडाची गणना केली जाते. या झाडाची वाढ झपाट्याने होते. हे झाड वीस मीटरपर्यंत उंची गाठू शकते. ही फुले एप्रिल आणि सप्टेंबर दरम्यान बहरतात.

प्रकार - झाड
कुठे पाहायला मिळतील - संपूर्ण मुंबईत

फोटो - गणेश रहाटे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा