Advertisement

स्किमिंगच्या मदतीनं अशी होते एटीएममधून चोरी

डेबिटकार्डचा वापर करून एटीएममधून पैसे चोरल्याच्या घटना अनेकदा कानावर येत असतात. स्किमिंगसारख्या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढच होत आहे. म्हणूनच आम्ही दिलेल्या टिप्सनं तुमच्या कार्डची आणि पिनच्या माहितीच्या मदतीनं पैसे चोरीला जाण्यापासून वाचू शकतात.

स्किमिंगच्या मदतीनं अशी होते एटीएममधून चोरी
SHARES

तुमच्या मोबाइलवर अचानक एक मेसेज येतो, ते पाहून तुमचे हातपायच थंड पडतात. तुमच्या बँक अकाऊंटमधून २० हजार डेबिट झाल्याचं कळतं. बँकेकडे तक्रार केल्यानंतर कळतं की अमूक एका एटीएममधून पैसे काढण्यात आले आहेत. पण आपण कुणाला डेबिट कार्ड दिलं नाही किंवा पासवर्ड दिला नाही. मग कसं कुणी डेबिट कार्डचा वापर करून पैसे काढू शकतं.? तर अशा प्रकारे पैसे काढण्याला स्किमिंग असं म्हणतात. स्किमिंग म्हणजे काय? त्यापासून कसं सावध रहायचं हेच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.स्किमिंग म्हणजे काय?

स्किमिंगच्या मदतीनं कार्ड धारकाची माहिती चोरली जाते. कार्डची माहिती चोरी करण्यासाठी एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये एक लहानसं उपकरण बसवलं जातं. या उपकरणाला स्किमर्स म्हणतात.


कसा होतो दुरपयोग?

कार्ड स्लॉटमध्ये कार्ड टाकून स्वाईप करतो तेव्हा या स्किमर्सद्वारे कार्डमधील माहिती चोरली जाते. पण पिनशिवाय ही माहिती काही उपयोगाची नसते. तो पिन नंबर चोरण्यासाठी  की पॅडच्या वर कॅमेरा बसवला जातो. तुम्ही पैसे काढताना पिन नंबर टाईप करता. तेव्हाच हा पिन की पॅडवर लावलेल्या कॅमेरात नोंद होतो. अजून एका पद्धतीनं पैसे काढले जातात ते म्हणजे, की पॅडवर एक पातळ थर लावला जातो. आपण टाईप करताना उमटलेल्या ठशांचा वापर करून पिन नंबर काढला जातो. या प्रकारे माहितीचा वापर करून दुसऱ्या एटीएममधून पैसे लंपास केले जातात.कसं ओळखाल स्किमिंग?

१) एटीएम मशीनसोबत चोरांनी छेडछाड केली असेल तिथे कार्ड रीडर नवीन कार्ड स्वीकारण्यासाठी जास्त वेळ लावतो.

२) कार्ड रीडरचा भाग सहजपणे बाहेर काढता येण्यासारखा किंवा अधांतरी बसवलेला असल्यासारखं वाटेल.
 ३) पिन नंबर चोरण्यासाठी सरकलेला की पॅड किंवा अलगत जोडलेला की पॅड जोडलेला असू शकतो.

४) पिन नंबर टाकाताना हातानं पिन नंबर झाका. चोरांना तुमचा पिन नंबर माहित नसेल तर कार्डमधील त्यांच्या हाती लागलेल्या माहितीचा काही उपयोग नाही.५) जिथं माणसांची जास्त रेलचेल असते अशा ठिकाणीच पैसे काढा. याशिवाय २४ तास सुरक्षा रक्षक एटीएमजवळ उपस्थित आहे का हे पाहा. सुरक्षा रक्षक असेल तरच त्या एटीएममधून पैसे काढा.

६) खात्यातून पैसे चोरी झाल्याचं कळताच तात्काळ तक्रार दाखल करा. 


हेही वाचा -

एटीएममध्ये अडकलेले पैसे 'असे' मिळवा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा