Advertisement

स्पेनमध्ये घुमणार मराठमोळ्या ढोल-ताशांचा डंका

लोककलेचा समृद्ध वारसा आणि त्यातली विविधता हे महाराष्ट्राला लाभलेलं वरदान. महाराष्ट्राच्या कणखर आणि रांगड्या परंपरेला शोभणारा ढोल-ताशाचा गजर आता सातासमुद्रापार कडाडणार आहे. मुंबईतील 'स्वरगंधार' ढोल पथक ढोल-ताशाचा डंका सातासमुद्रापार पोहोचवणार आहे.

SHARES

नाद ऐसा घुमतो आमचा , जातो नभी पाताळी खोल, 

विसरूनी जातो आम्ही जगाला, जेव्हा बांधतो कमरेला ढोल... 

ढोल-ताशांचा नाद दुमदुमू लागला की, प्रत्येकालाच मंत्रमुग्ध व्हायला होतं. ढोल-ताशांची परंपरा सध्या तरूण मंडळींना वेड लावत आहे. बाप्पाचं आगमन असो वा कोणत्याही मिरवणुकीची सुरुवात होते तीच ढोल-ताशांच्या कडकडाटात. ढोलाचा ठोका आणि ताशाची तर्री पडली की अनेकांचे पाय ताल धरू लागतात अन् वातावरणात आवाज घुमतो तो लयबद्ध आणि शिस्तबद्ध वादनाचा.लोककलेचा समृद्ध वारसा आणि त्यातली विविधता हे महाराष्ट्राला लाभलेलं वरदान. महाराष्ट्राच्या कणखर आणि रांगड्या परंपरेला शोभणारा ढोल-ताशाचा गजर आता सातासमुद्रापार कडाडणार आहे. मुंबईतील 'स्वरगंधार' ढोल पथक ढोल-ताशाचा डंका सातासमुद्रापार पोहोचवणार आहे.


परदेशात भरारी 

'युरोपियन फोकलोअर फेस्टिव्हल'तर्फे आयोजित 'फोक म्युझिक फेस्टिव्हल'साठी दहिसर इथल्या 'स्वरगंधार' या ढोलताशा पथकाची निवड झाली आहेयाअंतर्गत स्वरगंधार ढोलपथक २६ ते ३० जून २०१८ रोजी स्पेनला जाऊन आपल्या कलेचं सादरीकरण करणार आहे.

स्पेनमध्ये सादरीकरणा दरम्यान स्वरगंधार ढोलताशा पथकाचा पेहराव मराठमोळा असणार आहे. मुलांचा पांढरा शुभ्र सदरा-लेंगा, डोक्यावर फेटा, कपाळावर साजेसा टीळा तर मुली नऊवारी, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर या पारंपरिक वेशभूषेत असतील.दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील युरोपियन फोकलोअर फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. जगभरातल्या लोककलांना एकाच मंचावर आणून त्यांचं सादरीकरण करायची संधी या फोकलोअर फेस्टिव्हलमुळे उपलब्ध होते. यंदा हा मान स्वरगंधारला मिळाला आहे.

२५ जूनला स्वरगंधार स्पेनसाठी निघणार आहे. सध्या त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. स्वत:ची एक वेगळी छाप सोडण्यासाठी नवनवीन ताल ते बसवत आहेत. ताशाची ताल बदलत दुसऱ्या तालाची सुरुवात आणि मग त्या तालाला अनुसरून वाजणारा टोल या साऱ्यांची सध्या जोरदार रंगीत तालिम सुरू आहे.


मराठमोळी संस्कृती आणि सामाजिक एकता यांचा वारसा जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक ढोल ताशा संस्कृती सातासमुद्रापार पोहोचावी आणि ढोल ताशांचा गजर जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात घुमावा ही आमची जिद्द आहेही जिद्द उराशी बाळगून आम्ही फोकलोअर फेस्टिव्हलसाठी २०१७ साली अर्ज केला होतात्यासाठी आम्ही त्यांना काही व्हिडिओ प्रोफाइल पाठवले होतेत्यांना आमचा व्हिडिओ आवडला आणि फेस्टिव्हलसाठी आमची निवड झाली.  

- प्रसाद पिंपळे, संस्थापक-अध्यक्ष स्वरगंधार ढोल ताशा पथक
स्वरगंधारची यशस्वी वाटचाल 

१४ डिसेंबर २०१४ रोजी प्रसाद पिंपळे यांनी स्वरगंधार या ढोल तासा पथकाची स्थापना केली. तेव्हा त्यांच्या पथकात १५-२० तरूण सहभागी होते. ४ वर्षापूर्वी सुरू झालेल्या त्यांच्या या प्रवासात आता १४० तरूण- तरूणी सहभागी झाले आहेत. स्वरगंधारनं आत्तापर्यंत अनेक सामाजिक कार्यात देखील आपला हातभार लावला आहे. या पथकानं संपूर्ण मुंबईत नावलौकिक मिळवला आहे. आता हे पथक सातासमुद्रापार जाऊन भारताचं नाव उंचावणार आहेतफोटो सौजन्य - स्वरगंधार फेसबुक


हेही वाचा-

हा खेळ सावल्यांचा...शॅडो पपेट्सची अनोखी कला!संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा