आयआयटीमध्ये 'टेकफेस्ट'ची पर्वणी

Powai, Mumbai  -  

पवई - विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्यांना आयआयटी पवईमध्ये 'टेकफेस्ट'ची खास पर्वणी ठेवण्यात आलीय. आयआयटीचा संपूर्ण परिसर हा सध्या 'टेकफेस्ट'साठी सज्ज झालाय. शुक्रवार 16 डिसेंबर ते रविवार 18 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवामध्ये देशविदेशातील तंत्रज्ञानाची माहिती या 'टेकफेस्ट'मध्ये देण्यात येणार आहे. शुक्रवारी 'टेकफेस्ट'च्या पहिल्याच दिवशी रोबोटवॉर,इंटरनॅशनल प्रदर्शन, आणि अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. देशातील विविध इंजिनीअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले रोबोट यात सामिल होते. यावेळी सर्व रोबोटची एकमेकांशी झुंज लावण्यात आली. विशेष म्हणजे या महोत्सवात इंटरनॅशनल प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आलंय. यामध्ये देशविदेशातील कंपन्यांनी टॉल्स लावलेत. एखाद्या दिव्यांग व्यक्तीस वरदान ठरणारा बायोनिक प्रोसथेसिस व्हर्चूअल हात देखील पदर्शानात दाखविण्यात आलाय. ऑस्ट्रेलिया,बांगलादेश, अमेरिकेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी या महोत्सवात सहभाग घेतलाय.

Loading Comments