Advertisement

वर्सोवामध्ये पुन्हा एकदा भरला शेतकरी बाजार


वर्सोवामध्ये पुन्हा एकदा भरला शेतकरी बाजार
SHARES

वर्सोव्यामध्ये पुन्हा एकदा शेतकरी बाजार भरवण्यात आला आहे. यावेळी बाजारात फक्त शेतकऱ्यांचे भाजीचे स्टॉलच नाही, तर फूड आणि गेम स्टॉल देखील उभारण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही भाजी खरेदी करण्यापासून ते खाण्या-पिण्यापर्यंत सर्व गोष्टी अनुभवू शकता.शेतकरी बाजाराच्या निमित्तानं एकाच छताखाली आरोग्यासाठी फायदेशीर अशा सेंद्रीय आणि ताज्या भाज्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतातील ताज्या भाज्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होईल, या हेतूने वर्सोव्यामध्ये शेतकरी बाजार भरवण्यात आला आहेया ठिकाणी '१०१ मुंबई' हा स्टॉल देखील पाहायला मिळणार आहे. योगा तुमच्या आयुष्यासाठी किती फायदेशीर आहे? याविषयी जनजागृती १०१ मुंबई तर्फे करण्यात येईल. अशा प्रकारचे अनेक स्टॉल तुम्हाला इथं पाहायला मिळतील. यासोबतच अनेक ब्रँडचे उत्पादनकर्ते देखील असतील. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोलून त्या ब्रँडबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. ८ जुलैपर्यंत हा बाजार भरवण्यात आला आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement