Advertisement

काचेतून स्वरनिर्मिती


SHARES

कुर्ला - एखाद्याच्या हातात जादू असते हे ८३ वर्षांच्या परशुराम कबाडे यांच्याकडे बघितल्यावर अगदी पटतं... कुठलंही शास्त्रशुध्द शिक्षण न घेता कबाडे यांनी काचेच्या तुकड्यांमधून नादनिर्मिती केलीये. १५ वर्षांपासून भजनाला साथ देण्यासाठी म्हणून हे अनोखे वाद्य त्यांनी वाजवायला सुरूवात केली. या अनोख्या वाद्यानेच संगीतकार शंकर जयकिशन आणि हसरत जयपुरी यांचे लक्ष वेधले गेले आणि कबाडेंना बॉलिवुडचे दरवाजे खुले झाले. दुर्देव म्हणजे, काचेतून अनोखी स्वरनिर्मिती करणारा हा अवलिया आज मात्र उदरनिर्वाहासाठी ८३ व्या वर्षीही रिक्षा चालवतोय. पण सरकार दरबारी त्यांची दखल घेतली जावी, यापेक्षाही ही अनोखी कला जिंवत ठेवण्याची त्यांची धडपड तरी दखलपात्र ठरावी, हीच अपेक्षा !

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा