हुडहुडी

मुंबई - राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा उतरल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. त्यामुळे बोचऱ्या थंडीचा अनुभव नेहमीच उकाड्याने हैराण असणारे मुंबईकर घेत आहेत. शुक्रवारी सकाळी सांताक्रुझमधील तापमान 13.2 डिग्री होते तर कुलाब्यातील तापमान 13.5 डिग्री नोंदले गेले. गुरुवारी तापमानाने निचांक गाठला होता. गुरुवारी या ठिकाणी तापमान 12.5 डिग्रीपर्यंत खाली आले होते. हे तापमान म्हणजे गेल्या 5 वर्षातील तापमानाचा निचांक आहे. उत्तर महाराष्ट्रात तर मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही कडाक्याची थंडी जाणवत आहे. धुळ्याचे तापमान 4.4 डिग्रीपर्यंत खाली गेले आहे. नाशिकमध्ये 6 डिग्रीपर्यंत तापमान खाली आले आहे. अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे संचालक के.एस. होसाळीकर यांनी दिली. मात्र गुलाबी वाटणाऱ्या या थंडीत आजारानं देखील डोकं वर काढलंय.

Loading Comments