Advertisement

ई सिगारेटच्या बंदीवरून ट्वीटरवर मिम्सचा पाऊस, हसून हसून दुखेल पोट

सध्या सोशल मीडियावर भारतामध्ये ई सिगारेटवर बंदी घातल्याच्या निर्णयावरूनही मिम्स बनवण्यास सुरूवात झाली आहे.

ई सिगारेटच्या बंदीवरून ट्वीटरवर मिम्सचा पाऊस, हसून हसून दुखेल पोट
SHARES
Advertisement

केंद्र सरकारनं नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं एक मोठा निर्णय घेतला आहे. देशात ई सिगारेटच्या उत्पन्नावर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या निर्णयाची घोषणा केली. यानुसार ई सिगारेटच्या विक्री, इंपोर्ट, एक्सपोर्ट, जाहिरात आणि मॅन्युफॅक्चरिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. तसंच या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल अशी माहिती निर्मला सितारमण यांनी दिली


-सिगारेट म्हणजे?

ई सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेट. पेनसारखं हे उपकरण दिसतं. या उपकरणामध्ये सिगारेटमधील तंबाखूऐवजी द्रव्यरूपातील निकोटिनचा समावेश असतो. याला काडेपेटी किंवा लाइटरनं पेटवण्याची आवश्यकता नसते. ही सिगारेट बॅटरीवर चालते. यामधील बटन सुरू केले की द्रव्यरूपातील निकोटिनची वाफ बनते आणि ती सिगारेटप्रमाणे तोंडावाटे ओढली जाते. सिगारेटसारखी पेटवली जात नसल्यानं याची राख तयार होत नाही. यामध्ये द्रव्यरूपातील निकोटिन भरण्याची सोय असते. याचा सिगारेटप्रमाणे वासदेखील येत नाही. विविध प्रकारच्या फ्लेव्हर म्हणजे चवीमध्ये हे मिळतं.


सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

सध्या सोशल मीडियावर भारतामध्ये ई सिगारेटवर बंदी घातल्याच्या निर्णयावरूनही मिम्स बनवण्यास सुरूवात झाली आहेसंबंधित विषय
Advertisement