...म्हणून गणेश मूर्तींना पर्यावरणस्नेही रंगच हवेत!

Kandiwali
...म्हणून गणेश मूर्तींना पर्यावरणस्नेही रंगच हवेत!
...म्हणून गणेश मूर्तींना पर्यावरणस्नेही रंगच हवेत!
See all
मुंबई  -  

गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला असल्याने ठिकठिकाणी मूर्ती बनविण्याच्या कामाला सुरूवातही झाली आहे. यंदा प्लास्टर ऑफ पॅरीस आणि आईल पेंट इ. वस्तू जीएसटीच्या फेऱ्यात अडकल्याने गणपती मूर्तींच्या किमती 40 टक्क्यांनी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. परिणामी भाविकांकडून यंदा पर्यावरणस्नेही मूर्तींची अधिक मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे कारागीरांकडूनही मूर्ती घडवताना पर्यावरणस्नेही वस्तूंचा अधिकाधिक वापर करण्यात येत आहे.

बहुसंख्य मूर्तीकारांनी मूर्तीला रंगांचा साज चढविण्यासाठी आता ऑईल पेंटऐवजी वॉटर कलरचा वापर करण्याचे ठरवले आहे. वॉटर कलर पर्यावरणस्नेही असून वापर करण्यासही सोयीचा असल्याचे मूर्तीकार सांगतात.


वॉटर कलरच का?

ऑईल पेंटमध्ये तेलाचे प्रमाण प्रचंड असल्याने मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर या रंगाचा तवंग समुद्राच्या पाण्यावर तरंगताना दरवर्षी आपल्याला दिसतो. यामुळे समुद्रातील जीवांना मोठी हानी पोहोचते. त्यामुळेच आता मूर्तीकारांनी अधिकाधिक प्रमाणात वॉटर कलरचा वापर करण्याचे ठरवले आहे. वॉटर कलरमध्ये हानीकारक केमिकलचे प्रमाण अत्यंत नगण्य असते. ऑईल पेंटच्या तुलनेत वॉटर कलर स्वस्त असते.ऑईल पेंट घेते माशांचा जीव

ऑईल पेंटच्या वापरामुळे मूर्ती आकर्षक आणि चमकदार दिसतात. बहुतेककरून आॅईल पेंटचा वापर 6 फुटांपेक्षा जास्त म्हणजेच सार्वजनिक गणेशमूर्ती बनविण्यासाठीच केला जातो. या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर तीन दिवसांनी आॅईल पेंट समुद्राच्या पाण्यावर तरंगतो. या ऑईल पेंटमध्ये घातक केमिकलचा समावेश असल्याने हे केमिकल माशांचा जीव घेतात.


घरगुती गणेशमूर्ती जास्त पर्यावरणस्नेही

सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींच्या तुलनेत घरगुती गणेशमूर्तींमध्येच पर्यावरणस्नेही मूर्तींचे सर्वाधिक प्रमाण दिसून येते. कारण कुटुंबातील कुठल्याही एका सदस्याला पर्यावरणाचे भान असेल, तर त्यांची अंमलबजावणी कुटुंबातील इतर सदस्यही करतात. याउलट मंडळांच्या सदस्यांमध्ये आपली गणेशमूर्ती इतर मंडळांच्या तुलनेत अधिक आकर्षक कशी दिसेल, असाच विचार असल्याने बहुसंख्य मंडळ पर्यावरणस्नेही मूर्ती घेण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी लहान मूर्तींमध्येच वॉटर कलरचा सर्वाधिक वापर केला जातो.


वॉटर कलर केव्हाही पाण्याबाहेर येत नाहीत. मूर्तींसोबतच हा रंगही पाण्यात विरघळून जातो. या रंगांमुळे पर्यावरणाचे कुठलेही नुकसान होत नाही. त्याशिवाय वॉटर कलर अत्यंत पटकन बाजारात उपलब्ध होतो, सहजरित्या मूर्तीवर लावता येतो, तो जलदगतीने सुकतो आणि त्याची स्वच्छताही सहजपणे करता येते. याउलट ऑईल पेंट हाताला लागल्यावर त्वचेचे विकार होतात आणि पर्यावरणाचेही नुकसान होते. त्यामुळे कारागीर यंदा वॉटर कलरलाच प्राधान्य देत आहेत.


- शैलेंद्र काळे, मूर्तीकार, कांदिवली


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.