व्हिजेटीआयमध्ये रंगला 'वस्त्र' महोत्सव

 Matunga
व्हिजेटीआयमध्ये रंगला 'वस्त्र' महोत्सव
व्हिजेटीआयमध्ये रंगला 'वस्त्र' महोत्सव
व्हिजेटीआयमध्ये रंगला 'वस्त्र' महोत्सव
व्हिजेटीआयमध्ये रंगला 'वस्त्र' महोत्सव
व्हिजेटीआयमध्ये रंगला 'वस्त्र' महोत्सव
See all
Matunga, Mumbai  -  

माटुंगा येथील व्हि.जे.टी.आय टेक्सटाईल विभागाचा नावलौकिक असा 'वस्त्र' हा वार्षिक टेक्निकल फेस्ट शनिवारी रंगला. 

'टेक्निकल टेक्सटाईल' अशी यंदाची थीम घेऊन तंत्रज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा,पेपर प्रेझेंटेशन,पोस्टर प्रेझेंटेशन,प्रॉडक्ट मार्केटिंग,स्केचिंग या इव्हेंट्सचं आयोजन या फेस्टमध्ये करण्यात आले आहे.

उपस्थित असलेल्या ज्यूरींनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशन आणि पोस्टर्सचे कौतूक केले. महाराष्ट्रातील एकूण 15 टेक्सटाईल विभागाच्या महाविद्यालयांनी यात सहभाग घेतला असून, 50 हजार रूपयांपर्यंतची बक्षीसं त्यांना जिंकता येणार आहेत. 

याशिवाय टेक्सटाईल क्षेत्रातील 'इको-टेक्सटाईल आणि नॅनो-टेक्सटाईल या ग्लोबल ट्रेंडसचं सादरीकरण सुद्धा करण्यात आले. तर, वस्त्र हा खूप वेगळा इव्हेंट असून, यामध्ये टेक्सटाईल क्षेत्राच्या वेगवेळ्या विभागातील विद्यार्थांना सहभागी होता येतं. त्यातूनच त्यांना वेगळं काहीतरी करायची संधी उपलब्ध होते असे जी.एस. समीर मेमन यांनी सांगितले.

Loading Comments