Advertisement

शुल : देशातील पहिली इलेक्ट्रीक हायपर कार लाँच

ऑटोमोबाईल उत्पादक वाझीराणी ऑटोमोटीव्हनं देशातील पहिली इलेक्ट्रीक हायपर कार मुंबईत लाँच केली आहे.

शुल : देशातील पहिली इलेक्ट्रीक हायपर कार लाँच
SHARES

मुंबईस्थित ऑटोमोबाईल उत्पादक वाझीराणी ऑटोमोटीव्हनं देशातील पहिली इलेक्ट्रीक हायपर कार लाँच केली आहे. या आलिशान कारचे नाव 'शुल' आहे. या कारचा लूक डोळ्याचे पारणे फिटावा असाच आहे. आकर्षक लूक आणि शानदार फिचर्समुळे ही कार चर्चेत आहे.कला, तंत्रज्ञानाचा मिलाप

वाझीराणी कंपनीचे सहसंस्थापक आणि डिझायनर चंकी वाझीराणी यांनी शुलचं डिझाईन केलं आहे. यासाठी फोर्स इंडिया एफ १ टीमकडून इनपूट घेण्यात आलं. शुलचं डिझाईन कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आलं आहे. कदाचित ही कार कॅलिफोर्नियातच बनवण्यात येण्याची शक्यता आहे.तंत्रज्ञान आणि कला याचा परिपूर्ण मिलाप या कारमध्ये पहायला मिळतो. शुलचं डिझाईन भगवान शिवच्या त्रिशूल आणि जपानमधल्या ग्रॅन टुरिझो या प्रसिद्ध गेमवर आधारित आहे. कारच्या रियरमध्ये इंटीग्रेटे स्पॉयलर दिला आहे. स्पॉयलरमधून येणाऱ्या हवेला दिशा देण्यासाठी मागच्या बाजूस दोन फिन्स आहेत. कारला मायक्रो टर्बाइन दिलं आहे. मायक्रो टर्बाइन हे कारमधील बॅटरी चार्ज करण्याचं काम करतं.जबरदस्त वेग

सुरक्षेच्या दृष्टीनं देखील कारमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. समोरच्या बाजूल दोन एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय कारचा वजन रेशिओ देखील कमी ठेवण्यात आला आहे. वजन रेशिओ जितका कमी तितकी कार वेगात धावू शकते. तासाला ही कार १०० किलोमीटर धावते. इलेक्ट्रीक हायपर कारची किंमत १ मिलियन म्हणजेच १० लाख रुपयांच्या घरात असते. शुलची किमत देखील १० लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.


या कारची तांत्रिक माहिती आणि परफाॅर्मन्सच्याबाबतीत कंपनीकडून कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. पण येत्या दोन-तीन वर्षांमध्ये ही कार आपल्याला रस्त्यावर पाहता येऊ शकते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement