Advertisement

मुंबईच्या रस्त्यावर धावल्या 'विंटेज कार'


SHARES

फोर्ट -  एरव्ही फक्त चित्रपटात आणि चित्रात पाहायला मिळाणाऱ्या या दुर्मिळ आणि अलिशान जुन्या गाड्या रविवारी मुंबईत धावताना दिसल्या. 

अलिशान अशा या गाड्यांकडे पाहून मुंबईकर अवाक तर झालेच मात्र मुंबईच्या रस्त्यांची शानही या गाड्यांनी वाढवली.

 'द विंटेज अॅड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया'च्या (व्हीसीसीसीआय) वतीने 'विटेंज कार रॅली'आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी या रॅलीला झेंडा दाखवला  आणि एकामागोमाग एक या कार मुंबईच्या रस्त्यावर धावू लागल्यात. 1931 पासून ते 1990 सालापर्यंतच्या 'रोल्स रॉईस', मॉरिस,ऑस्टीन,फोर्ड,विलीज,प्रीमियर पद्मिनी,कॉन्टेसा, पिजोट,फियाट,टाटा सीएरा,वोक्सवॅगन,कॅम्पर,मितसुबिशी या गाड्या मुंबईकरांनी याची देही याची डोळा पाहिल्यात. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा