Advertisement

मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचे साक्षीदार व्हा!


मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचे  साक्षीदार व्हा!
SHARES

मुंबईचा वारसा नैसर्गिक असो वा मानवनिर्मित असो तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. मुंबईच्या पोटात अनेक गुपितं आहेत जे पुढच्या पिढीला देखील ज्ञात असणं आवश्यक आहे. हाच विचार करून 'वॉकिंग विथ वर्ड्स' या संस्थेनं हॅरिटेज वॉकचं आयोजन केलं आहे.


हॅरिटेज वॉकची खासियत?

तुम्ही तुमच्या आजी-आजोबांच्या तोंडून जुन्या मुंबईविषयी खूप काही ऐकलं असेल. अरे मुंबई कधी काळी अशी दिसायची, इथं एक किल्ला होता, इंग्रज भारतात कसे आलेअशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण तुम्हाला प्रत्यक्ष त्या गोष्टी पाहायला मिळाल्या तर? किती छान ना! वॉकिंग विथ वर्ड्सनं हाच विचार करून फोर्ट परिसरात हॅरिटेज वॉकचं आयोजन केलं आहे.

फोर्ट परिसरात तुम्हाला अशा अनेक गोष्टींचा खजिना मिळेल. गेटवे ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी, फोर्ट किल्ला याबाबतच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजू शकतील. इस्ट इंडिया कंपनी भारतात कशी आणि कधी आली? इस्ट इंडिया कंपनीचा विस्तार कसा झाला? बॉम्बेला मुंबई ही ओळख कशी मिळाली? याचा उलगडा या हॅरिटेज वॉकच्या माध्यमातून होणार आहे.  


कधी आणि कुठे होणार?

तुम्हाला देखील मुंबईचा सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जाणून घेण्याची इच्छा असेल तर वॉकिंग विथ वर्ड्सनं आयोजित केलेल्या हॅरिटेज वॉकमध्ये सहभागी व्हायासाठी तुम्हाला ७५० रुपये मोजावे लागतील१० जून म्हणजेच रविवारी सकाळी ८ ते सकाळी १०.३० या वेळेत या हॅरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहेतिकिट बुक करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.



कव्हर फोटो सौजन्य


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा