Advertisement

जुहूत अवतरलं गोवा! बीचवर वाॅटर स्पोर्ट्सची मजा!


जुहूत अवतरलं गोवा! बीचवर वाॅटर स्पोर्ट्सची मजा!
SHARES

वाॅटर स्पोर्टचा थरार आणि मजा लुटण्यासाठी मुंबईकरांना आतापर्यंत गोवा वा तारकर्लीची वाट धरावी लागत होती. आता मात्र गोवा-तारकर्लीतील वाॅटर स्पोर्टची मजा आणि थरार मुंबईकरांना मुंबईतच अनुभवता येत आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या पुढाकाराने जुहू बीचवर अखेर वाॅटर स्पोर्ट्स सुरू झाले असून सध्या मुंबईकर त्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.



सर्वच किनारपट्ट्यांचा होणार कायापाल

पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिकांना रोजगार मिळावा या उद्देशानं सागरी मंडळानं मुंबई ते कोकण किनारपट्टीलगतच्या सर्वच बीचचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गतच सहा महिन्यांपूर्वी जुहू, गिरगाव, वर्सोवा, मार्वे, वसई जेट्टी आणि भाईंदर या बीचवर गोवा आणि तारकर्लीच्या धर्तीवर वाॅटर स्पोर्ट्स सुरू करण्याचा निर्णय सागरी मंडळानं घेतला होता. जुहूतील वाॅटर स्पोर्टसाठी सेवा पुरवण्यासाठी अशा कंपन्यांकडून निविदा मागवल्या होत्या. ही निविदा प्रक्रिया अंतिम करत मंडळाने नुकतीचं जुहू येथे वाॅटर स्पोर्ट सेवा सुरू केली आहे.



कमीत तमी २०० रूपये दर

सेलिंग बाय वाॅटर स्पोर्टस प्रा. लि. कंपनीकडून जुहू बीचवर वाॅटर स्पोर्टची सेवा पुरवली जात आहे. कमीत कमी २०० ते जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंच्या राईड इथं असून मुंबईकरांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी १५० मुंबईकरांनी वाॅटर स्पोर्टचा थरार आणि मजा लुटल्याची माहिती समोर येतेय. कोणत्याही तीन राईड ६०० रुपये आणि पाच राईडसाठी १००० रुपये असे दर आहेत. तर फ्लाय फिश राईडसाठी २०० रुपये, बनाना राईडसाठी २०० रुपये, बंपर राईडसाठी २०० रुपये, जेटस्की राईडसाठी ३०० रुपये असे दर आहेत. दर जास्त असल्याने मुंबईकर नाराज असले तरी वाॅटर स्पोर्टचा आनंद लुटण्यासाठी हवी ती रक्कम मोजताना अनेक मुंबईकर दिसत आहेत.


२५ मेपर्यंतच सुरू रहाणार वॉटर स्पोर्ट्स

जुहू बीचवर वाॅटर स्पोर्टची सुरू झालेली ही सेवा २५ मे पर्यंतच असेल. त्यानंतर मात्र वाॅटर स्पोर्ट बंद होतील आणि पावसाळा संपल्यानंतर अर्थात दिवाळीच्या आसपास पुन्हा ही सेवा सुरू होईल, अशी माहिती सागरी मंडळाकडून देण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा