• समुद्रात बनणार तरंगतं हॉटेल
  • समुद्रात बनणार तरंगतं हॉटेल
SHARE

गिरगाव - चौपाटीवर येणार्‍या हजारो पर्यटकांसाठी आता वॉटर स्पोर्ट्सबरोबरच समुद्रातील तरंगतं हॉटेल (फ्लोटेल) आणि सी प्लेनची सुविधाही उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी दोन जेट्टी उभारण्यात येणार असून, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि राज्य शासन यांचा हा संयुक्त उपक्रम असेल. गिरगाव चौपाटीवर असलेल्या मफतलाल क्लबच्या जवळ १४ वर्षापासून सुरू असलेले एचटू वॉटर स्पोर्ट्स सेंटर गेल्या वर्षी बंद पडलं होतं. काही वर्षापूर्वी या स्पोर्ट्स सेंटरचा मोठा गाजावाजा करून उद्घाटन केलं होते. आता हे केंद्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या हातात पुन्हा आलं आहे. ही ५ हजार चौरस फूट जागा आणि बाजूची समुद्रातील जागा मिळून आता दोन जेट्टी आणि अत्याधुनिक पर्यटन सुविधा उभारण्यात येणार आहे. राज्यभरातून या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांसाठी आकर्षणाचं हे नवं केंद्र असेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या