Advertisement

'या' ट्रिक्स वापरून काढा सफरचंदावरील मेण

सफरचंद खाताना आपण ते धुऊन खातो. पण तेवढ्यानं सफरचंदावरील मेण निघून जात नाही. हेच मेण सफरचंदाच्या माध्यमातून आपल्या पोटात जातं आणि याचे परिणाम हळूहळू जाणवू लगातता.

'या' ट्रिक्स वापरून काढा सफरचंदावरील मेण
SHARES

एक सफरचंद दररोज खा आणि डॉक्टरांपासून लांब राहा... हा सल्ला आपण आरोग्याच्या बाबतीत नेहमीच ऐकत असतो. पण सध्या बाजारात येणारे सफरचंद खाऊन डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल एवढं मात्र खरं. बाजारातील लाल, चमकदार सफरचंद आरोग्याचे गणित बिघडवू शकतात. याचं कारण म्हणजे सफरचंदावरील लालबुंद चकाकी. ही चकाकी मेणानं येते

आता तुम्ही म्हणाल सफरचंद खाण्यापूर्वी धुऊनच खातो. पण सफरचंदावरील मेण मात्र तरीही निघत नाही. ते तसंच राहतं आणि आपल्या पोटात जातं. याचे परिणाम तुम्हाला कालांतरानं जाणवू लागतात. मेण लावलेलं सफरचंद खाल्याचे काय परिणाम होतात? आणि सफरचंदावरील मेण काढायचं तरी कसं? यासंदर्भात माहिती देणार आहोत


सफरचंदावर मेण का ?

सफरचंद हे फळ लवकर खराब होणारे आहेते झाडावर असताना खराब होऊ नये म्हणून त्यावर नैसर्गिकरित्या मेणासारखा पांढरा द्रव येतो. परंतु हे फळ तोडल्यानंतर व्यापाऱ्यांना विकताना सफरचंद चकचकीत दिसावे म्हणून त्याला कापडानं पुसण्यात येतं. त्यामुळे त्यावरील आवरण निघून जाते आणि सफरचंद खराब होण्याची शक्यता असते. यावर पर्याय म्हणून सफरचंद मेणाच्या पाण्यात बुडवले जाते. नंतरच ते पेटीत भरले जाते. सफरचंद एक्सपोर्ट करताना ही प्रक्रिया केली जाते. सफरचंदावर मेण चढवल्यानंतर महिनाभर आधीचे सफरचंददेखील ताजे राहते आणि ते खराबही होत नाही.


मेण पोटात गेल्यास काय होतं?

  • मेण पोटात गेल्यावर किडनीवर परिणाम होतो. किडन्या कमकुवत होतात
  • शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते.
  • पचनशक्ती कमी होऊन गॅसची समस्या निर्माण होते
  • मेणामुळे शरीरात विष तयार होते.त्यामुळे मेंदूचेही आजार उद्भवतात.


मेण कसे काढाल?

१) अॅपल सायडर व्हिनेगर 

अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करून तुम्ही मेण काढू शकता. यासाठी एका साफ कपडयावर अॅपल सायडर व्हिनेगरचे ५-६ थेंब घ्या आणि सफरचंद त्या कपड्यानं पुसुन घ्या. ही क्रिया दोन तीन वेळा करा. त्यानंतर सफरचंद धुऊन खाऊ शकता. लक्षात ठेवा सफरचंद चांगल्या प्रकारे धूऊन खा. कारण व्हिनेगर हे अॅसेडिक आहे.


२) गरम पाणी

सफरचंदावरील मेण काढण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू शकता. सफरचंदावर गरम पाणी टाका. तुम्हाला सफरचंदावर प्लास्टिकचा तेलकटपणा जाणवेल. दोन-तीन वेळा गरम पाणी टाकून त्यावरील मेण निघून जाईल.

३) लिक्विड स्प्रे

व्हिनेगर आणि पाणी एकत्र करून तयार झालेलं मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा. त्यानंतर प्रत्येक अॅपलवर स्प्रे करा. १०-१५ मिनिटं सफरचंद तसंच ठेवा. त्यानंतर सफरचंद चांगल्या प्रकारे धुऊन खाता येऊ शकतात.


४) बेकिंग सोडा

एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा लिंबाचा रस आणि ३०० मिली पाणी मिक्स करा. या पाण्यात सफरचंद टाकून ठेवा. -१० मिनिटानंतर सफरचंद धुऊन खाऊ शकता. किंवा तयार मिश्रणाचे थेंब एका कापडावर टाका आणि सफरचंद पुसून घ्या. यानंतर सफरचंद धुऊन घ्या. सफरचंदावरील मेण साफ नसेल झालं तर पुन्हा ही प्रक्रिया करा. चांगल्या प्रकारे धुऊनच सफरचंद खा.

५) वोडका

वोडक्यामध्ये मिक्स केलेल्या कपड्यानं सफरचंद पुसून घ्या. -१० मिनिटांनी सफरचंद चांगलं धुऊन घ्या. सफरचंद नीट धुतले नाही तर सफरचंदाला वेगळी चव येईल.


६) मायक्रोवेव्ह

तुम्ही मायक्रोव्हच्या मदतीनंदेखील मेण साफ करू शकता. यासाठी डिफोर्स्ट मोडमध्ये सफरचंद अर्धा मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर पेपरनं किंवा कापडानं पुसून काढा आणि धुऊन खा.


७) सुरीनं काढा मेण

सुरी तर प्रत्येक घरात असतेच. मग सुरीनं सफरचंदावरील मेण काढता येऊ शकतेमेण काढल्यानंतर सफरचंद धुऊन खाऊ शकता



हेही वाचा -

पिण्याव्यतिरिक्त कॉफीचा असाही वापर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा