Advertisement

पिण्याव्यतिरिक्त कॉफीचा असाही वापर


पिण्याव्यतिरिक्त कॉफीचा असाही वापर
SHARES

कॉफी... आपल्यापैकी अनेक जण कॉफी अगदी आवडीनं पितात. काही जणांची दिवसाची सुरुवात होते ती कॉफीनेच. चहा शौकिनांचं कसं असतं तसंच या कॉफीप्रेमींचं असतं. दिवसाला पाच-सहा कप कॉफी पोटात जात नाही तोपर्यंत काही समाधान होत नाही. पण तुम्हाला माहित आहे का? सर्वांच्या आवडत्या या कॉफीचे पिण्याव्यतिरिक्त देखील अनेक फायदे आहेत. याच फायद्यांची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत


) कॉफी ही खास करून त्याच्या अरोमा म्हणजेच सुगंधासाठी ओळखली जाते. आपल्यालादेखील कॉफीचा हाच सुगंध आवडतोपण मुंगी, मच्छर या किटकांना मात्र कॉफीचा हा सुगंध अजिबात आवडत नाही. केमिकलयुक्त स्प्रे मारण्यापेक्षा तुम्ही घरातल्या काना-कोपऱ्यांमध्ये थोडीशी कॉफी पावडर स्प्रे करू शकता


) कॉफी बिन्स या दिसायला खूप छान असतातजर तुमच्याकडे खराब झालेल्या कॉफी बिन्स असतील तर त्या फेकून न देता त्याचा उपयोग फ्लॉवरपॉट भरण्यासाठी घेऊ शकतायामुळे तुमच्या घराला वेगळा लूक तर येईलच. पण यासोबत कॉफीचा अरोमा घरभर दरवळेल.


) खाण्याच्या पदार्थांना फ्रेश ठेवण्यासाठी आपण फ्रिजचा वापर करतो. पण अनेकदा एवढ्या गोष्टी एकत्र ठेवल्यानं फ्रिजमध्ये वेगळाच दुर्गंध येत असतो. अशावेळी काही दिवस एका वाटीत कॉफी पावडर ठेवावीयामुळे तुमच्या फ्रिजमधील दुर्गंध निघून जाईल. हे तुम्ही तुमच्या घरीदेखील ट्राय करू शकता. रूम फ्रेशनर वापरण्यापेक्षा याचा वापर अधिक फायदेशीर ठरेल.



) कंपोस्ट खत बनवताना कॉफी फार उपयोगी आहे. कारण यामुळे कंपोस्ट खत बनवण्यासाठी उपयुक्त अशा जीवाणूंची वाढ वेगानं होतेशिवाय कॉफीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि नायट्रोजन असल्यानं रासायनिक मुक्त खत तयार होते.


) तुमच्या हाताला कांदा आणि लसणीचा वास येत असल्यास तुम्ही कॉफीचा हँडवॉश म्हणून वापर करू शकता.


) फेसपॅक म्हणून देखील कॉफीचा वापर करता येऊ शकतो. कॉफीमध्ये शरीरावरील डेड स्किन काढण्याची क्षमता असतेयासाठी कॉफीमध्ये १ टेबलस्पून बेकिंग सोडा मिक्स करा आणि २० मिनिटं चेहऱ्याला लावा. त्यानंतर चेहरा धुवून टाका. सुरुवातीला थोडं लावून बघा. कारण प्रत्येकाची स्किन वेगळी असते. तुम्हाला जर त्याचा काही त्रास झाला नाही तरच चेहऱ्यावर लावा. 


) तुम्ही कुत्रा पाळत असाल तर कॉफीचा वापर कुत्र्यांवर देखील करू शकताकुत्र्यांच्या शरीरावर असणाऱ्या किड्यांपासून तुम्ही सुटका करू शकता. आंघोळ घातल्यानंतर तुम्ही कुत्र्याच्या अंगावर कॉफी पावडर लावू शकता.


) तुमच्या आसपास मांजरींचा वावर आहे. पण तुम्हाला मांजर आवडत नाहीमग अशा वेळी थोडी कॉफी तुम्ही त्या भागात ठेवू शकता. कारण मांजरींना कॉफीचा वास आवडत नाही.


) घरी असलेल्या फर्निचरला तुम्ही कॉफीचा एक कोट लावू शकता. यामुळे तुमच्या घरी असणारं फर्निचर क्लिन आणि शाईनी दिसेल.


१०) कॉफीचा रंग म्हणजे नैसर्गिक डाय असतो. याचा उपयोग तुम्ही कागद आणि कापडावर करू शकता. पण कापड आपण धुतो. वारंवार पाणी लागून रंग जाऊ शकतो. त्यामुळे अशा वस्तूंवर कॉफीचा वापर करा ज्याला तुम्ही पाणी लाऊ शकत नाही.

 

११) तुमचे केस पांढरे झाले असतील तर कॉफी हा चांगला पर्याय आहे. कारण कॉफी केसांना नैसर्गिक रंग देते. सुरुवातीला केसाच्या थोड्याशा भागात लावा. परिणाम चांगला असेल तर संपूर्ण केसांना लावा. 



हेही वाचा

स्टारबक्सची 'ही' कॉफी बनायला लागतात ४८ तास




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा