Advertisement

स्टारबक्सची 'ही' कॉफी बनायला लागतात ४८ तास

इराणी हॉटेलची जागा घेतली आहे कॉफी आऊटलेट्सनं. या कॉफी आऊटलेट्समध्ये कॉफी अन् बरंच काही... असा माहोल पाहायला मिळतो. दरांपासून ते चवीपर्यंत प्रत्येक गोष्टीत कॉफी तिचं वेगळेपण सिद्ध करते. अशा या कॉफीची एक नवी चव काॅफीप्रेमींच्या जिभेवर तरळण्यासाठी सज्ज झाली आहे.

स्टारबक्सची 'ही' कॉफी बनायला लागतात ४८ तास
SHARES

कॉफी म्हणजे अनेकांचा विक पॉईंट. एकमेकांसोबत वेळ घालवता यावा म्हणूनही कॉफीची निवड केली जाते. पूर्वी इराणी हॉटेलवर चहाप्रेमींच्या मैफिली रंगायच्या. आता इराणी हॉटेलची जागा घेतली आहे कॉफी आऊटलेट्सनं. या कॉफी आऊटलेट्समध्ये कॉफी अन् बरंच काही... असा माहोल पाहायला मिळतो. दरांपासून ते चवीपर्यंत प्रत्येक गोष्टीत कॉफी तिचं वेगळेपण सिद्ध करते. अशा या कॉफीची एक नवी चव काॅफीप्रेमींच्या जिभेवर तरळण्यासाठी सज्ज झाली आहे.


कॉफीचे ४८ तास

चार दशकाहून अधिक काळ जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या स्टारबक्सनं कॉफीची एक नवीन रेंज आणली आहे. 'नायट्रो कोल्ड ब्रू' हा नवीन फ्लेवर कॉफीप्रेमींना स्टारबक्समध्ये ट्राय करता येईल. उत्तम दर्जाच्या बियांपासून ही कॉफी बनवण्यात येते. ही कॉफी बनवण्यासाठी जवळपास ४८ तास  लागतात. यामध्ये नायट्रोजन मिक्स केलेला असतो. त्यामुळे या कॉफीमध्ये एकप्रकारचा स्मूथनेस येतो. या कॉफीमध्ये मूळात  नैसर्गिकरित्या गोडवा असल्यानं त्यात साखर अॅड करायची देखील गरज उरत नाही. बीअर टॅप करतात तशीच ही कॉफी देखील टॅप केली जाते. 


 

याशिवाय स्टारबक्समध्ये व्हॅनिला स्वीट क्रिम कोल्ड ब्रू देखील तुम्ही ट्राय करू शकता. स्टारबक्स कोल्ड ब्रूमध्ये व्हॅनिला स्वीट क्रिम आणि बर्फ अधिक प्रमाणात असते.

भारतात स्टारबक्सचे अनेक आऊटलेट्स आहेत. पण स्टारबक्स 'नायट्रो कोल्ड ब्रू' भारतातील केवळ ५ आऊटलेट्समध्येच उपलब्ध आहे.


इथं मिळते 'ही' काॅफी

  • कमला मिल्स, मुंबई
  • जया नगर, बंगळुरु
  • ग्रीन पार्क, दिल्ली
  • डिएलएफ मॉल, नोएडा
  • पार्क मेंशन्स, कोलकात्ता




हेही वाचा-

चहा शौकिनांसाठी नवं डेस्टिनेशन 'बबल्स'



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा