Advertisement

चहा शौकिनांसाठी नवं डेस्टिनेशन 'बबल्स'

डॉ. बबल्स या ब्रॅण्डचे मालक अदनन सरकार यांनी चहाबाजांना हा तायवानी चहा मुंबईत उपलब्ध करून दिला आहे. बबल चहा हा एक सुगंधित चहाचा फ्लेवर आहे. चहा गरम असताना प्यायचा असतो, असं सर्वांचं मत आहे. पण डॉ. बबल्समध्ये आईस टी, आईस कॉफी, फ्रूट टी असे चहाचे नवनवीन अवतार देखील तुम्ही ट्राय करू शकता.

चहा शौकिनांसाठी नवं डेस्टिनेशन 'बबल्स'
SHARES

हाला नाही म्हणणारा कुठे शोधून सापडणार नाही. कधी काळी दुधाचा साधा चहा आपण सर्वच प्यायचो. पण त्यात देखील आता क्रांती झाली आहे. मसाला चहा, ग्रीन टी अशा अनेक प्रकार चहामध्ये आले आहेत. त्यामुळे चहाच्या शौकिनांमध्ये चांगलीच भर पडली आहे. नवनव्या चवीच्या शोधात असणाऱ्या चहाबाजांना आता तायवानी पद्धतीचा चहा चाखण्याची संधी 'डॉ. बबल्स' या आऊटलेटमुळे उपलब्ध झाली आहे. 


डॉ. बबल्सची खासियत

डॉ. बबल्स या ब्रॅण्डचे मालक अदनन सरकार यांनी चहाबाजांना हा तायवानी चहा मुंबईत उपलब्ध करून दिला आहे. बबल चहा हा एक सुगंधित चहाचा फ्लेवर आहे. चहा गरम असताना प्यायचा असतो, असं सर्वांचं मत आहे. पण डॉ. बबल्समध्ये आईस टी, आईस कॉफी, फ्रूट टी असे चहाचे नवनवीन अवतार देखील तुम्ही ट्राय करू शकता. 



अनेक जण डेअरी प्राॅडक्ट जसं की दूध, पनीर, दही, लस्सी असे पदार्थ खाणं पसंत करत नाहीत. डेअरी प्राॅडक्टला काही पर्याय नसल्यानं अशा लोकांना मिल्कशेक, चहा, लस्सी अशा पदार्थांपासून वंचित रहावं लागतं. पण डॉ. बबल्समुळे तुम्हाला हे पदार्थ देखील चाखता येणार आहेत. कारण डेअरी प्रॉडक्टचा वापर न करताच बनवलेला आईस टी, आईस कॉफी, लस्सी, मिल्कशेकचा इथल्या मेन्यूमध्ये समावेश करण्यात आला आहे. डेअरी प्रॉडक्टला पर्याय म्हणून इथं नॉन डेअरी क्रिम वापरण्यात येतं. त्यामुळे डेअरी प्रॉडक्ट न खाणाऱ्यांसाठी तर हा एक स्वर्गच आहे.



डेअरी प्रॉडक्टचा वापर न करताही आम्ही चहा, मिल्कशेक, लस्सी असे प्रॉडक्ट तयार करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं म्हणजे आमचा प्रयत्न यशस्वी ठरला. डेअरी प्रॉडक्ट ऐवजी आम्ही क्रिम वापरतो. हे क्रिम हेल्दी आहे आणि डेअरी प्रॉडक्टला उत्तम पर्याय आहे.

- अदनन सरकार, मालक, डॉ. बबल्स


ग्रीन कॉफी ट्राय केलीत का?

डॉ. बबल्सनं त्यांच्या पेयांमध्ये ग्रीन कॉफी मिसळण्याची नवीन संकल्पना आणली आहे. ग्रीन कॉफी वजन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पेय मानलं जातं. ग्रीन काॅफीमुळे मेटॅबॉलिझम वाढून त्याचा त्वचा आणि केसांना फायदा होतो. त्यातही महत्त्वाचं म्हणजे या काॅफीत जराही  कॅफिन नसतं आणि ही काॅफी कडवटही नसते.


मुंबईतल्या वांद्रे, कार्टर रोड, कुर्ल्यातील फिनिक्स मार्केट सिटी इथं डॉ. बबल्सच्या चहाचा आस्वाद घेता येईल आहे. याशिवाय ठाणे, घाटकोपर, वाशी इथं देखील डॉ, बबल्सच्या आऊटलेटला भेट देत येईल.



हेही वाचा-

एक कप चहा आणि त्याचे 75 फ्लेवर्स!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा