Advertisement

आता पांढऱ्या केसांना करा बाय बाय

अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येतून बचावण्यासाठी योग्य खाणं-पिणं तर हवंच. पण अनेक सवयी बदलणंदेखील आवश्यक आहे. नैसर्गिक रंगांचा वापर करणं हे केसांसाठी हितकारी आहे.

आता पांढऱ्या केसांना करा बाय बाय
SHARES

आधुनिक आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आजच्या तरुणांमध्ये प्रत्येक तीन जणांमागे एकामध्ये अकाली केस पांढरे होण्याची समस्या आढळून येते. अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येतून बचावण्यासाठी योग्य खाणं-पिणं तर हवंच. पण अनेक सवयी बदलणंदेखील आवश्यक आहे. यामध्ये प्रचंड वेळ जातो तोवर केस काही पांढरे तर आपण ठेवू शकत नाहीमग अशा वेळी अनेक जण बाजारात उपलब्ध असणाऱ्या केमिकलयुक्त रंगांचा वापर करतात. पण यामुळे केसांवर अनेक दृष्परिणाम होतात. त्यामुळे नैसर्गिक रंगांचा वापर करणं हे केसांसाठी हितकारी आहे. आम्ही तुम्हाला आज घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे केस कलर करता येतील. खाली दिलेल्या टिप्सवर काही शंका असल्यास संपूर्ण केसांना कलर लावण्याएेवजी फक्त केसांचा जेवढा भाग पांढरा झाला आहे तिकडेच लावावा.


१) हिना

हिना लावल्यास केस लाल किंवा चॉकलेटी रंगाचे होतात. हिनाच्या पावडरमध्ये थोडे तीळाचे तेल आणि कढीपत्ता एकत्र करून लावल्यास फायदा होतो.

कसा बनवाल डाय?

  • थोडे तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची पानं टाकून तेल हवाबंद डब्यात ठेवा. जेव्हा तुम्हाला केस रंगवायचे असतील तेव्हा त्यात हिनाची पावडर टाकून काही मिनिटांसाठी तेल गरम करून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर ही पेस्ट केसांना लावा. -४ तास केसांवर राहू द्या. त्यानंतर केस शिकाकाईनं धुवून टाका.
  • केसांना लाल रंग हवा असेल तर हिनाच्या पावडरमध्ये बीटाचा रस मिसळून ती पेस्ट केसांवर लावा.


  • केसांना तांबूस रंग हवा असेल तर हिनाच्या पावडरमध्ये लिंबाचा रस आणि दही यांचे एकत्र मिश्रण करून त्यात थोडा चहाचा अर्क टाकून केसांना लावा.
  • हिना आणि नीळ एकत्र केल्यानं तुम्हाला चॉकलेटी रंगाच्या विविध छटा मिळू शकतात. जर तुम्हाला केस लालसर रंगात हवे असल्यास हिना पावडरचे प्रमाण अधिक ठेवा. जर चॉकलेटी अधिक प्रमाणात करायचे असल्यास नीळ अधिक टाका.


२) चहा आणि कॉफी

  • चहा आणि कॉफीमध्ये केस रंगवण्याची, केस अधिक तपकिरी करण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी चहा आणि कॉफीचे मिश्रण दाट असणे आवश्यक आहे. यासाठी चहा पावडर किंवा टी बॅग्सचा वापर करा.  • दाट कॉफीदेखील फार उपयुक्त आहे. कॉफी पाण्यात उकळून ते मिश्रण केसांना लावल्यास गडद तपकिरी रंग मिळेल. यासाठी चहा किंवा कॉफीच्या पाण्यात केस बुडवून ठेवा
  • कॉफी डाय बनवण्याचा सोपा मार्ग म्हणजे कॉफी हेअर कंडिशनरसोबत मिक्स करा आणि केसांना लावा.


३) आवळा

आवळ्यात केसांना रंग देण्याची क्षमता आहे. याशिवाय आवळ्यामुळे केसांना चकाकी येते. त्यामुळे केसांना रंग लावताना डायच्या मिश्रणात शेवटच्या टप्प्यात आवळ्याची पावडर टाकावी. यामुळे रंग केल्यानंतर तुमच्या केसांना चकाकी येईल.


४) अक्रोडचं कवच

अक्रोडची टणक कवचं केसांना गडद चॉकलेटी रंग देण्यास मदत करतात. अक्रोडची कवचं पाण्यात अर्धा तास उकळा.ते पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर केसांच्या ज्या भागांवर रंग द्यायचा आहे तिकडे कापसाच्या बोळ्यानं हे पाणी लावा. तासभर केस तसेच राहू द्या. त्यानंतर शाम्पूनं केस धुवून टाका. मात्र गरम पाण्यानं केस धुवू नका. महत्त्वाचं म्हणजे या पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या वस्तूंचा देखील रंग बदलू शकतात.हेही वाचा

५ हजार वर्षांपासूनची लिपस्टिकची परंपरा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा