Advertisement

५ हजार वर्षांपासूनची लिपस्टिकची परंपरा


५ हजार वर्षांपासूनची लिपस्टिकची परंपरा
SHARES

आज सर्वच स्त्रीया लिपस्टिक वापरतात. लिपस्टिकच्या वापरामुळे स्त्रीच्या सौंदर्यात चार चांद लागतात. स्त्रीयांच्या सुंदरतेत भर टाकणारी लिपस्टिकची कल्पना नेमकी आली कुठून? लिपस्टिकचा वापर कधी सुरू झाला? याचा कधी विचार केला आहे का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आहेत.



) सुंदर दिसण्यासाठी लिपस्टिक लावण्याची संकल्पना जवळपास ५००० वर्षांपूर्वीपासूनची आहे.

) सुमेरियन संस्कृतीतल्या स्त्री-पुरुषांनी आकर्षक दिसण्यासाठी ओठांना लिपस्टिक लावायला सुरुवात केली. त्यावेळी रंगासाठी ते रत्न वापरत. रत्नाचा चुरा करून तो ओठांवर लावण्यात येत असे.


) इजिप्शियन संस्कृतीमध्ये लिपस्टिकला खरं रुप मिळालं. इजिप्तशियन जांभळ्या, काळ्या आणि लाल रंगाचा वापर ओठ रंगवण्यासाठी करत.

) इजिप्तशियन एका विशिष्ठ प्रकारच्या किटकाला चिरडून त्यापासून लाल रंग तयार करत. इजिप्तची राणी क्लिओपात्रा देखील किटक आणि मुंग्यांपासून तयार करण्यात आलेल्या लिपस्टिकचा वापर करत.


) त्याकाळी इजिप्तमध्ये शिसेब्रोमिन मॅनसाइट आणि आयोडिन अशा घातक पदार्थांपासून लिपस्टिक तयार केली जात असे.

) मध्ययुगीन युरोपात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाल्यानंतर लिपस्टिक ही निषिद्ध केली गेलीत्याकाळी अशी समजूत होती की ओठांना लिपस्टिक लावणारी स्त्री ही चेटकिण असते आणि ती सैतानाची पूजा करते.



) पण लिपस्टिकची क्रेझ लोकांमध्ये एवढी होती की बंदी असली तर स्त्रीया ओठांना लाल रंग यावा म्हणून ओठ रगडत. त्यामुळे त्यांच्या ओठांना इजा देखील होत.

) १८८४ साली ग्युरलिन या फ्रेंच परफ्यूम कंपनीनं पहिल्यांदा लिपस्टिक बाजारात आणली. ही लिपस्टिक बनवण्यासाठी हरणाची चरबी, मेण आणि एरंडेल तेलाचा वापर केला जायचा.

) लिपस्टिकची ट्यूब फिरवली की लिपस्टिकचं आतील टोक बाहेर येतं ही संकल्पना १९१५ साली मौरीस लेव्ही या उद्योजकानं पहिल्यांदा मांडली. त्यानंतर धातूच्या नळीत बसवलेली लिपस्टिक बाजारात आली. यानंतरच लिपस्टिकला स्त्रीयांची पसंती मिळाली आणि लिपस्टिक वापरणं देखील सोपं झालं.



हेही वाचा

लिपस्टिक अधिक काळ टिकवायचीय? मग हे करा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा