Advertisement

लिपस्टिक अधिक काळ टिकवायचीय? मग हे करा

तसं तर लिपस्टिक लावायला सर्वच महिलांना आवडतं. पण महिलांची सर्वात मोठी समस्या म्हणजे लिपस्टीक टिकवणं. लिपस्टिक लावली की ती काही तासांमध्ये पुसली जाते. त्यामुळे दिवसातून ४-५ वेळा लिपस्टिक लावावी लागते. महिलांची हीच समस्या लक्षात घेत लिपस्टिक टिकवण्यासाठी काही टिप्स देत आहोत.

लिपस्टिक अधिक काळ टिकवायचीय? मग हे करा
SHARES

लग्न समारंभ, पार्टी असो की ऑफिसमधील एखादा कार्यक्रम; महिलांनी लिपस्टिक लावली नाही, असं क्वचितच घडेल. ठराविक कार्यक्रमच नव्हे, तर रोज लिपस्टिकचा वापर करणाऱ्याही अनेक महिला आहेत. तसं तर लिपस्टिक लावायला सर्वच महिलांना आवडतं. पण महिलांची सर्वात मोठी समस्या म्हणजे लिपस्टीक टिकवणं. लिपस्टिक लावली की ती काही तासांमध्ये पुसली जाते. त्यामुळे दिवसातून ४-५ वेळा लिपस्टिक लावावी लागते. महिलांची हीच समस्या लक्षात घेत लिपस्टिक टिकवण्यासाठी काही टिप्स देत आहोत. या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.



१) वातावरणातील बदलांमुळे ओठांवर परिणाम होतात. ओठांवर मृत त्वचा वारंवार येत असते. ही मृत त्वचा पूर्णपणे काढून ओठांची त्वचा मुलायम करता येते. यासाठी दात घासण्याच्या ब्रशवर थोडं व्हॅसलिन लावा आणि ओठांवर हलकं घासा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल. यामुळे लिपस्टिक दिर्घकाळ ओठांवर राहील.

२) ओठ वारंवार कोरडे पडत असल्यास त्यावर मॉइश्चरायझर किंवा फाऊंडेशन लावा. यामुळे ओठांची त्वचा ओली राहण्यास मदत होते आणि लिपस्टिक जास्त काळ टिकते. 

३) लिपस्टिक लावल्यानंतर एका मिनिटाने ओठांना आईस्क्रिम लावा. यामुळे लिपस्टिक जास्त काळ टिकते.

४) लिपस्टिक जास्त काळ टिकावी यासाठी लिपस्टिक फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमध्ये ठेवलेली लिपस्टिक लावल्यानं ती अधिक काळ टिकते. 



५) आपल्या आवडीची लिपस्टिक लावताना ब्रशचा वापर करा. ब्रशच्या मदतीनं लिपस्टिकचा पहिला कोट लावा. त्यानंतर लिपस्टिकचा दुसरा कोट लावा. यामुळे लिपस्टिक जास्त काळ टिकते.

६) ओठांवर ट्रांसलुऐंट पावडर लावा. याने शेड सेट होईल आणि आपली लिपस्टिक पसरणार नाही. तसंच हलकिही पडणार नाही. यासाठी सुरुवातीला लिपस्टिक लावा. त्यानंतर टिश्यू पेपर ओठांवर ठेवावा आणि त्यावर ट्रांसलुऐंट पावडर लावावी. यामुळे तुमची लिपस्टिक जास्त काळ टिकेल.

७) ओठांना आकर्षण लूक देण्यासाठी लिप लायनरचा वापर योग्य ठरेल. लिप लायनरनं फक्त आऊटलाइन करू नका तर लपस्टिक सारखा लिप लायनरचा वापर करा. त्यानंतर ओठांवर लिपस्टिक लावा. लिप लायनरचा बेस हा थोडा वॅक्सी असल्यानं लिपस्टिक अधिक काळ टिकून राहते. 

८) सर्वात महत्त्वाचं लिपस्टिक खरेदी करताना चांगली कंपनी निवडणं आवश्यक आहे. यावर लिपस्टिक टिकणं अवलंबून असते. 



हेही वाचा-

'हे' ११ घरगुती फेसपॅक वाढवतील चेहऱ्याचे सौंदर्य



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा