नऊवारी नेसून सायकलिंग

वांद्रे - अगं बाई, नऊवारी साडी नेसून सायकलिंग? नऊवारी साडी आणि सायकल चालवणं हे कॉकटेल थोडं विचित्र वाटेल. पण या महिलांनी बिनधास्त नऊवारी साडी नेसून सायकल मॅरॅथॉनमध्ये सहभाग घेतला. वांद्रे किल्ला ते कार्टर रोड असा प्रवास या महिलांनी सायकलवरून केला. ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम होता.

प्रसिद्ध अभिनेते आणि मॉडेल मिलिंद सोमणही महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आले होतं. या वेळी त्यांनीही महिलांसोबत सायकल मॅरॅथॉनमध्येही सहभाग घेतला. या मॅरॅथॉनमधून महिलांनी आम्ही पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही, हेही दाखवून दिलं. चूल, मूल आणि करिअर सांभाळत तारेवरची कसरत करणाऱ्या या महिलांचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.

Loading Comments