मनाच्या दुर्बलतेवर मिळवा विजय

    मुंबई  -  

    मुंबई - अलक्ष्मी ही गरिबी, दु:ख, आणि दुर्भाग्य यांचं प्रतीक आहे. अलक्ष्मी ही लक्ष्मी देवीची जुळी बहीण आहे. शक्ति, सुख आणि समृद्धीसोबत मनाचे वाईट विचार, हालअपेष्टाही आपल्या जीवनात येतात. ज्यामुळे आपण हताश होतो. मात्र आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट गोष्टी म्हणजे राग, लोभ, कटुता, नाकारात्मकता, खोटे मान- अपमान या सर्वांवर विजय मिळवला, तर आपल्याला कुणीच अडवू शकणार नाही. जगात माफ करण्यापेक्षा मोठी अशी कोणतीही गोष्ट नाही. स्वभाव क्षमाशील असेल, तर आपण आयुष्यात नक्कीच प्रगती साधू शकतो. लक्ष्मीपूजन याच सकारात्मकतेचं प्रतीक आहे.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.