शिवसेनेकडून 35 महिलांना रिक्षा वाटप

  मुंबई  -  

  मुलुंड - महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून काम करतात. मग ते कोणतंही क्षेत्र असो. अंतराळात जाणं असो, चर्मकाम असो, डॉक्टर, पोलीस, वैमानिक असो, अशा अनेक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. आता तर स्त्रियांनी ऑटोरिक्षाच्या व्यवसायातही पुढाकार घेतलाय. मुलुंडच्या वीर संभाजी महाराज सभागृह येथे शिवसेनेतर्फे 35 महिलांना ऑटोरिक्षा देण्यात आल्या. महाराष्ट्र रिक्षाचालक सेना आणि मातोश्री महिला बचत गट महासंघाने या योजनेसाठी पुढाकार घेतला.

  महिला स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हाव्यात हा या योजनेमागचा उद्देश आहे. मातोश्री महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्ष रश्मी ठाकरे यांच्या हस्ते या महिलांना ऑटोरिक्षाची चावी देण्यात आली. या कार्यक्रमाला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची खास उपस्थिती लाभली. या क्षेत्रात आता महिला उतरल्यामुळे पुरुष रिक्षाचालकांची मक्तेदारी संपुष्टात येणार हे मात्र नक्की..

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.