Advertisement

माशांच्या जगाची अनोखी सफर

पेट लव्हर्स क्लब, मुंबई, ए-मार्ट आणि अ‍ॅक्वरिस्ट क्लब मुंबई, महाराष्ट्र पेट असोसिएशन आणि भवन्स नेचर अॅण्ड अ‍ॅडव्हेंचर सेंटर या संस्थांच्या सहयोगानं ‘वर्ल्ड ऑफ फिश’ या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे.

माशांच्या जगाची अनोखी सफर
SHARES

वेगवेगळ्या प्रजातीचे मासे एकाच ठिकाणी बघण्याची संधी मत्स्यप्रेमींसाठी उपलब्ध झाली आहे. पेट लव्हर्स क्लब, मुंबई, -मार्ट आणि अ‍ॅक्वरिस्ट क्लब मुंबई, महाराष्ट्र पेट असोसिएशन आणि भवन्स नेचर अॅण्ड अ‍ॅडव्हेंचर सेंटर या संस्थांच्या सहयोगानं ‘वर्ल्ड ऑफ फिश’ या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे


४०० हून अधिक मासे 

विविध ठिकाणच्या १४० मत्स्यालयातील अ‍ॅरोवामा, अ‍ॅरोप्रीयामा, डेव्हिल फिश, अ‍ॅलिगेटर गार, स्टिंग रे, व्हीमल, मार्स फिश, स्टार फिश अशा सुमारे चारशेहून अधिक प्रजातींचे मासे प्रदर्शनात पाहता येतील. वेगवेगळ्या प्रजातीचे रंगीबीरंगी मासे मात्र चिमुकल्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत.  माशांच्या दुर्मीळ प्रजाती, समुद्रजीवन, इतर जलजीव अशा अनेक विषयांबाबत प्रदर्शनात माहिती देण्यात येत आहे. याशिवाय प्राण्यांची कशी काळजी घ्यायची?, प्राण्यांचं रेस्क्यू कसं करायचं? याचं प्रात्यक्षिक देखील पाहता येणार आहे


कुठे?

तुम्हाला देखील या मत्स्यप्रदर्शनांचा आनंद घ्यायचा असेल तर भवन्स नेचर अँड अ‍ॅडव्हेंचर सेंटरला नक्की भेट द्या. ९ जूनपर्यंत तुम्ही सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत हे प्रदर्शन पाहू शकता. यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जातील




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा