क्रिस्पी, क्रंची खिचिया पापड

    मुंबई  -  

    दादर- ही दृश्यं पाहाताय ना... तुम्हाला वाटेल नेमकं काय चाललंय हे... हा आहे सध्या छबीलदासच्या गल्लीत खवय्यांत लोकप्रिय होत चाललेला खिचिया पापड. चटणी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर लावून हा यम्मी पापड तयार केला जातो. पापडाशिवाय अनेकांचं जेवण होतच नाही असं म्हणतात . मग तो तळलेला असो वा भाजलेला. हॉटेलमध्ये तर स्टार्टर म्हणून पापडाला अनेकांची पसंती असते. पाणीपुरी, भेळ, स्वीट कॉर्नच्या सोबत आता मसाला पापडही दाखल झालाय. त्यातही खिचिया पापड हा सध्या विशेष लोकप्रिय ठरतोय. खाऊ गल्लीत येणाऱ्या अनेकांचे पाय या पापडाकडे वळतायत. दादरची छबीलदास गल्ली च्याऊ-माऊसाठी प्रसिद्ध आहेच. इथे येणाऱ्या खवय्यांची पसंती आता या खिचिया पापडाला मिळू लागलीये. तुम्हीसुद्धा खवय्या असाल, तर मग या खिचिया पापडासाठी छबिलदास गल्ली गाठायलाच हवी...

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.