'झपुर्झा' सेतू माणुसकीचा

  Mulund
  'झपुर्झा' सेतू माणुसकीचा
  मुंबई  -  

  मुलुंड - महाविद्यालय म्हटलं कि बेभान तरुणाई आणि त्या तरुणाईचे अनेक आगळेवेगळे फेस्टिव्हल आलेच. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलुंडमधील व्ही.जी.वझे महाविद्यालय येथे 'झपूर्झा' हा फेस्टिव्हल पार पडला. दरवर्षी एक नवीन संकल्पना घेऊन हा फेस्टिव्हल आयोजित केला जातो. या वर्षी 'सेतू माणुसकीचा' ही संकल्पना राबवण्यात आली होती.

  शुक्रवारी झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये मुंबईमधील अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. पथनाट्ये, टाकाऊपासून टिकाऊ, क्लॉथ पेंटिंग, शॉर्ट फिल्म अशा अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांमध्ये तरुणाईने उत्स्फूर्त असा सहभाग घेतला होता. सादर केलेल्या पथनाट्यातून अनेक सामाजिक संदेश तरुणांपर्यंत पोहोचवण्यात आले.

  मागील वर्षी साठ्ये महाविद्यालयाकडे असणारी झपुर्झाची फिरती ट्रॉफी यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने जिंकली. वझे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या फेस्टिव्हलचे नियोजन वझे महाविदयालयातील एन.एस.एस. च्या विदयार्थ्यांनी केले होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.