Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘टकाटक 2’च्या शूटिंगला सुरुवात

गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधत ‘टकाटक 2’च्या मुहूर्ताचा शॉट घेण्यात आला आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘टकाटक 2’च्या शूटिंगला सुरुवात
SHARES

‘टकाटक 2’ चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या घोषणेनंतर लगेचच ‘टकाटक’च्या शूटिंगचा शुभारंभही करण्यात आला आहे. गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधत ‘टकाटक 2’च्या मुहूर्ताचा शॉट घेण्यात आला आहे.

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली बनवणाऱ्या ‘टकाटक 2’ची निर्मिती ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम करत आहेत. तर जगत सिंग सहनिर्माते आहेत. ‘टकाटक’ या चित्रपटाप्रमाणेच ‘टकाटक 2’च्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानं संपूर्ण टीमला एक वेगळाच हुरूप आला आहे.

मोशन पोस्टरला मिळालेल्या यशाचा आनंद सेलिब्रेट करीत ‘टकाटक 2’च्या टीमनं चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा या चित्रपटात प्रेक्षकांना तरूणाईवर आधारित असलेलं कथानक पहायला मिळणार असलं तरी सर्वच वयोगटातील रसिकांसाठी यात एक जबरदस्त मेसेज दडलेला असेल असं निर्मात्यांचं म्हणणे आहे.

‘टकाटक 2’ची संकल्पना मिलिंद कवडे यांचीच असून, कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. किरण बेरड यांनी कथानाकाला पोषक असं संवादलेखन केलं आहे. पुन्हा एकदा या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

प्रथमेशसह अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, भारत गणेशपुरे, आशा शेलार, किरण माने, पंकज विष्णू, निशा परूळेकर, राहुल बेलापूरकर, किरण बेरड, आरजे महेश काळे, अभय कुलकर्णा आणि इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘टकाटक 2’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक उत्तम कलाकृती देण्याचा आपला प्रयत्न असल्याची भावना मिलिंद कवडे यांनी व्यक्त केली आहे. रसिकांनी जसं ‘टकाटक’वर भरभरून प्रेम केलं तसेच ‘टकाटक 2’वरही करावं आणि ते करतीलही अशी आशाही कवडे यांनी व्यक्त केली आहे.

जय अत्रे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, संगीत दिग्दर्शन वरूण लिखते यांनी केलं आहे. निलेश गुंडाळे कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत असून या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणा-या कॅमेरामन हजरत शेख वली यांच्या नजरेतून नयनरम्य लोकेशन्समधील निसर्गसौंदर्य प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.हेही वाचा

'संगीत मानापमान' हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर, सुबोध भावेंचं दिग्दर्शन

मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021चा बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड ‘या’ चित्रपटाच्या नावे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा