Advertisement

कार्तिक वारीला अवतरणार ‘विठ्ठल’!


कार्तिक वारीला अवतरणार ‘विठ्ठल’!
SHARES

आपल्याकडे देवादिकांवरील मालिका आणि चित्रपटांना फार मोठा चाहता प्रेक्षकवर्ग आहे. या प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन वरचेवर देवादिकांची महती वर्णन करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत असते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलावर आजवर बरेच चित्रपट आले आहेत. प्रत्येक दिग्दर्शकाने आपल्या परीनं विठ्ठलाच्या महतीचं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. दिवाळी काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्यानंतर लगेचच येणाऱ्या पंढरपूरच्या कार्तिक वारीचं औचित्य साधत रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा ‘विठ्ठल’ अवतरणार आहे.


कधी येणार सिनेमा?

मराठीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील मालिका तसेच चित्रपटांमधून विठ्ठलावर आधारित अनेक कथानकं सादर झाली आहेत. सावळ्या विठ्ठलावर आधारित असलेल्या या सर्व कलाकृती प्रेक्षकांनादेखील आवडत आहेत. अशा या विठ्ठलवेड्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी लवकरच एक नवाकोरा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘विठ्ठल’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट १४ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्राला हरिनामाच्या गजरात तल्लीन करण्यास येत आहे.


चित्रपटाचा फर्स्ट लुक लाँच

राजीव रुईया यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला. १९ नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशी असून, त्यापूर्वी प्रदर्शित ‘विठ्ठल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने ही वारकरी भक्तमंडळींसाठी एक अनोखी पर्वणीच ठरणार आहे. या चित्रपटात विठ्ठल एका आगळ्यावेगळ्या स्वरुपात वावरताना दिसून येणार असून, विठ्ठलाच्या व्यक्तिरेखेत कोण दिसणार? हे गुपित अद्याप उघड करण्यात आलेलं नाही.

या चित्रपटात प्रार्थना बेहरेचीही भूमिका असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय अशोक समर्थ, हर्षदा विजय, भाग्यश्री मोटे, दीप्ती धोत्रे आणि हितेन तेजवानी या कलाकारांचादेखील यात समावेश आहे.


हेही वाचा - 

‘राजमा चावल’ खाण्यासाठी पुन्हा हरयाणवी बनला अपारशक्ती

‘नाळ’ १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा