...म्हणून बबनचा शेवट बदलला!

एकीकडे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे मात्र चित्रपटातील शेवटच्या सीनवरून प्रेक्षक नाराज आहेत. प्रेक्षकांची हीच नाराजी लक्षात घेऊन चित्रपटाची सुरूवात आणि शेवटच्या दहा मिनिटांचे प्रसंग चित्रपटातून काढून टाकले आहेत.

  • ...म्हणून बबनचा शेवट बदलला!
SHARE

सध्या 'बबन' हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र गाजत आहे. आतापर्यंत ८.५ कोटींचा हा गल्ला या चित्रपटाने कमावला आहे. एकीकडे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे मात्र चित्रपटातील शेवटच्या सीनवरून प्रेक्षक नाराज आहेत. प्रेक्षकांची हीच नाराजी लक्षात घेऊन चित्रपटाची सुरूवात आणि शेवटच्या दहा मिनिटांचे प्रसंग चित्रपटातून काढून टाकले आहेत.३० मार्चला ग्रामीण भागातील राजकारण आणि प्रेम यावर 'बबन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटातील संवाद प्रेक्षकांना अधिक भावले. 'बबन'ला मिळणारा प्रतिसाद पाहून 'बबन'चे खेळही वाढवण्यात आले. चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया कळवल्या. त्यात चित्रपटाविषयी लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र, चित्रपटाच्या शेवटाबबात प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

संपूर्ण चित्रपट विनोदी असताना शेवट मात्र अतिशय दु:खद करण्यात आल्याने प्रेक्षकांना शेवट भावला नाही. त्याचबरोबर 'बबन'वर 'सैराटची' छाप असल्याच्या प्रतिक्रियाही टीम बबनला आल्या. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनुसार चित्रपटाचा शेवटचा प्रसंग काढून टाकण्यात आला आहे.हेही वाचा

सैराटलेला 'बबन'!

'रेडू'च्या खात्यात आणखी ९ नामांकनं!


संबंधित विषय
ताज्या बातम्या