• ‘देवाक काळजी’ म्हणत २४ तासांमध्ये केलं ४ गाण्यांचं रेकॉर्डिंग
SHARE

देश-विदेशांतील सिने महोत्सवांमध्ये गाजलेल्या ‘रेडू’ या सिनेमातील अजय गोगावलेच्या आवाजातील ‘देवाक काळजी…’ या लोकप्रिय गाण्यानंतर आता याच शीर्षकाचा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील ४ गाण्यांचं रेकॉर्डिंग २४ तासांमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगळे विषय, वेगळ्या संकल्पना येताना दिसत आहेत. संकल्पनेसोबतच कामही तेवढंच दर्जेदार होत आहेत. नुकताच आगामी मराठी चित्रपट 'देवाक काळजी'चा संगीतमय मुहूर्त करण्यात आला. ह्या मुहूर्ताचे विशेष म्हणजे संगीत दिग्दर्शक श्रेयश आंगणे ह्यांनी तब्बल २४ तासांत ४ गाण्यांचे रेकॉर्डिंग पूर्ण केले आहे. श्रेयश ह्यांनी अगोदर गावठी, ट्रकभर स्वप्नं, तिचा उंबरठा ह्या चित्रपटांसाठी संगीत दिलेले आहे. देवाक काळजी चित्रपटासाठी श्रेयशने स्वतः २ गाणी गायली असून इतर दोन गाणी आनंद शिंदे आणि इत्यादी ह्यांच्या मधुर आवाजात सुरबद्ध करण्यात आली आहे.

या सिनेमाच्या मुहूर्तावेळी संगीत दिग्दर्शक श्रेयश यांनी आपलं मत प्रकट करत म्हटलं की, चित्रपटचा आत्मा चित्रपटाच्या कथेसह संगीतात ही असतो. दोघे एकमेकांना पूरक असावे लागतात. माझ्या कारकिर्दीतील देवाक काळजी हा चित्रपट खुप महत्त्वपूर्ण आहे. चित्रपटाचे संगीत खुप छान व दर्जेदार झाले असून प्रेक्षकांनाही ते नक्की आवडेल अशी माझी आशा आहे. रिकॉर्डिंग २४ तासात पूर्ण झालं असलं तरी मी या ४ गाण्यांचं कम्पोजिशन, ट्रेकमेकिंग तन्मयतेनं मागील अडीच महिन्यांपासून करत होतो.

देवाक काळजी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत खेडेकर यांच्याकड़े असून, लेखन निखिल चंद्रकांत पाटील यांचं आहे. सिनेमॅटोग्राफी हरेश सावंत यांच्या नजरेतून पडद्यावर उतरणार आहे , तर नृत्यदिग्दर्शन अमित बाइंग करणार आहेत. देवाक काळजी हा चित्रपट एक संगीतमय प्रेमकथा असून चित्रपटात अजिंक्य राऊत, दिव्या पुगांवकर, श्रमेश बेटकर मुख्य भूमिकेत असून नागेश मोर्वेकर, नरेंद्र केरेकर, सागर जाधव आणि डॉ बाबु तडवी हे कलाकार सहायक भूमिकेत दिसतील. हा चित्रपट पुढल्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा  -

मॅगीचा ‘टकाटक’ अंदाज पाहिला का?

या कलाकारानं चाखली पर्णच्या प्रँन्क्सची चव
संबंधित विषय
ताज्या बातम्या