सईच्या मराठमोळ्या अदा पाहिल्या का?

काही अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या तरी आपलं मूळ कधीच विसरत नाहीत. त्यामुळंच सणासुदीचे दिवस आले की त्या मराठमोळ्या रूपात दिसतात. अभिनेत्री सई ताम्हणकरचं हे नऊवारीतील रूपडं तिच्या चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुरेसं आहे.

  • सईच्या मराठमोळ्या अदा पाहिल्या का?
  • सईच्या मराठमोळ्या अदा पाहिल्या का?
SHARE

काही अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या तरी आपलं मूळ कधीच विसरत नाहीत. त्यामुळंच सणासुदीचे दिवस आले की त्या मराठमोळ्या रूपात दिसतात. अभिनेत्री सई ताम्हणकरचं हे नऊवारीतील रूपडं तिच्या चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुरेसं आहे.


मराठमोळा गेटअप

आमिर खानच्या बहुचर्चित 'गजनी' चित्रपटात एक लहानशी भूमिका साकारत नावारूपाला आल्यानंतर थेट सुभाष घईंची मराठी निर्मिती असलेल्या 'सनई चौघडे'द्वारे मराठीत झळकलेली सई सध्या चांगलीच चर्चेत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत जम बसवत असताना तिनं मराठीची कास कधीच सोडली नाही. याच कारणामुळं सईनं आपला एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. सध्या मराठी सणांचे दिवस असल्यानं आपल्या आवडत्या कलाकारांना मराठमोळ्या रूपात पहायला सर्वच चाहत्यांना आवडतं. कदाचित हीच गोष्ट हेरून सईनं आपले मराठमोळ्या गेटअपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


घायाळ करणारं सौंदर्य 

तसं पाहिलं तर सई सोशल मीडियाप्रेमी आहे. मध्यंतरी काही काळ ती सोशल मीडियापासून दूर गेली होती, पण ती फार काळ या विश्वापासून दूर राहू शकत नाही. ती नेहमी आपले नवनवीन फोटोज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळं सई नेमकं काय करतेय हे तिच्या चाहत्यांना चांगलंच ठाऊक असतं. सईनं शेअर केलेले नऊवारी साडीतील फोटो चाहत्यांना भलतेच खुश करणारे आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कायम हॅाट आणि बोल्ड शैलीत दिसणाऱ्या सईचं मराठमोळं सौंदर्य अनेकांना घायाळ करणारं आहे.


भरजरी नऊवारी

सईनं या फोटोंमध्ये लाल भडक काठ आणि त्यावर सोनेरी नक्षीकाम केलेली भरजरी नऊवारी परिधान केली आहे. साडी लाल रंगाची नसून वांगी कलरची आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काठपदराच्या या नऊवारी साडीवर सईनं त्याच शैलीतील ब्लाऊज न परिधान करता थोडा मॅाडर्न लुक असलेलं ब्लाऊज घातलं आहे. त्यामुळं या निमित्तानं सईनं जणू पारंपरीक आणि आधुनिक शैलीतील वस्त्रांचा संगम घडवण्याचा प्रयत्न केल्यासारखं वाटतं. हातात बांगड्या, नाकात नथ, कपाळावर टिकली, गळ्यात दागिने आणि केसात लाल गुलाब असं सईचं रूप या फोटोंमध्ये पहायला मिळतं.हेही वाचा -

अनिश गोरेगावकरनं केलं 'एक टप्पा आऊट'

शिवानी सुर्वेची डबल गुड न्यूज

'राजकुमार' करणार इतिहासाची पुनरावृत्ती!
संबंधित विषय
ताज्या बातम्या