Advertisement

संजयचा ‘लकी’ येतोय...


संजयचा ‘लकी’ येतोय...
SHARES

छायालेखनापासून दिग्दर्शन आणि निर्मितीपर्यंत जवळजवळ फिल्म मेकिंगच्या सर्व विभागात मुक्तपणे संचार करणारा संजय जाधव आता ‘लकी’ हा नवा कोरा सिनेमा घेऊन येतोय.

संजयने स्वत:च सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या 'लकी' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे हे या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.


सिनेमाच्या संहितेवर काम

‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘गुरू’, ‘येरे येरे पैसा’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलेल्या संजयने आता ‘लकी’ या नव्या सिनेमाची केवळ घोषणाच केली आहे. इतर गोष्टींबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत असल्याने या सिनेमात कोण दिसणार याबाबत उत्सुकतला वाढली आहे. 

सध्या या सिनेमाच्या संहितेवर काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर सिनेमाच्या स्टारकास्टचा विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या या सिनेमाविषयी जास्त बोलता येणार नसल्याचं संजयचं म्हणणं आहे. सिनेमाच्या घोषणेवेळीच रिलीज डेटही जाहीर करणं ही संजयच्या सिनेमांची खासियत बनली आहे. यानुसार संजयने ‘लकी’ ७ डिसेंबर २०१८ रोजी सिनेमागृहात झळकणार असल्याचे घोषित केलं आहे.



हेही वाचा -

Exclusive: अभिनेत्री मृण्मयीचं दिग्दर्शनात पदार्पण!

सप्टेंबरमध्ये सिनेमागृहांमध्ये दरवळणार ‘परफ्युम’



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा