Advertisement

दोन माजी आमदार बनले नगरसेवक


दोन माजी आमदार बनले नगरसेवक
SHARES

मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजपाच्या वतीने मंगेश सांगळे, अतुल शहा आणि शिवसेनेच्या वतीने विशाखा राऊत हे निवडणूक रिंगणात उतरले होते. परंतु या निवडणुकीत मंगेश सांगळे यांचा पराभव झाला असून शहा आणि राऊत हे विजयी झाले आहेत. त्यामुळे दोन माजी आमदार हे नगरसेवक बनून महापालिकेत गेले आहेत.

मनसेतून भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार मंगेश सांगळे हे विक्रोळी कन्नमवार नगरमधून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. परंतु सांगळे यांचा पराभव शिवसेनेचे उपेंद्र सावंत यांनी करत सांगळे यांना घरीच बसवले आहे. तर माजी आमदार अतुल शाह हे गिरगाव कुंभारवाडा येथील प्रभाग 220 मधून निवडणूक लढवत होते. त्यांना शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांचे आव्हान होते. परंतु वारंवार फेरमतमोजणी करूनही समसमान मत पडल्यामुळे चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवाराची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात नशिबाने शहा यांच्याबाजूने कौल दिला. त्यामुळे शहा यांचा महापालिकेत जाण्याचा मार्ग सुकर झाला.

प्रभाग 191 मधूनही शिवसेनेच्या वतीने माजी आमदार विशाखा राऊत यांना उमेदवारी दिली होती. या मतदार संघात मनसेच्या स्वप्ना देशपांडे, भाजपाच्या डॉ. तेजस्विनी जाधव यांचे आव्हान असतानाही अटीतटीच्या लढतीत विशाखा राऊत विजयी ठरल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत आता दोन माजी आमदार नगरसेवक म्हणून काम करणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा