Advertisement

राम कदमांच्या अडचणी वाढल्या, दोन याचिका दाखल

घाटकोपर इथं दहीहंडीदरम्यान राम कदम यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केलं. या विधानाचे...पडसाद मुंबईसह राज्यात उमटले. राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत करवाई तसंच त्यांच्या राजिनाम्याची मागणी झाली. तर त्यांनी माफी मागावी अशीही मागणी होती. पण त्यांच्याकडून केवळ दिलगिरीच व्यक्त होत होती. अखेर राज्य महिला आयोगाच्या दणक्यानंतर ते नरमले आणि त्यांनी माफी मागितली.

राम कदमांच्या अडचणी वाढल्या, दोन याचिका दाखल
SHARES

महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणं भाजपा नेते राम कदम यांना चांगलंच भोवल आहे. तर आता त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल झाल्या आहे.

राष्ट्रवादी कांग्रेसच्या पुणे महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राम कदम यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. तर पनवेल मधील भीम आर्मीच्या कार्यकर्ती नेहा शिंदे यांनी राम कदम यांच्याविरोधात कारवाई न केल्या प्रकरणी याचिका दाखल केल्याची माहिती शिंदे यांचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी दिली आहे.

पडसाद मुंबईसह राज्यात

घाटकोपर इथं दहीहंडीदरम्यान राम कदम यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केलं. या विधानाचे...पडसाद मुंबईसह राज्यात उमटले. राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत करवाई तसंच त्यांच्या राजिनाम्याची मागणी झाली. तर त्यांनी माफी मागावी अशीही मागणी होती. पण त्यांच्याकडून केवळ दिलगिरीच व्यक्त होत होती. अखेर राज्य महिला आयोगाच्या दणक्यानंतर ते नरमले आणि त्यांनी माफी मागितली.

तरी कारवाई नाही

माफी मागितली तरी त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांच्याविरोधातील संताप कायम असून घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. असं असताना आता त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

21 सप्टेंबरला सुनावणी

महिलांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई करणारी याचिका चाकणकर यांनी केली आहे. या याचिकेवर 21 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. तर शिंदे यांच्या याचिकेनुसार राम कदम यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतरही पोलिसांनी कारवाई का केली नाही? असा सवाल केला आहे. या याचिकेवरही लवकरच सुनावणी अपेक्षित असं अॅड. सातपुते यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा -

अडचणी वाढल्या! राम कदमांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा